Agriculture news in Marathi, pomegranate auction of 'E-Naam' offline | Agrowon

‘ई-नाम’मधील डाळिंबाचे लिलाव ऑफलाइनच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जुलै 2019

पुणे ः बाजार समित्यांमधील शेतीमाल विक्रीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ऑनलाइन राष्ट्रीय बाजाराची (ई-नाम) अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र पुणे बाजार समितीमध्ये ई-नामची अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. राज्य शासनाने वारंवार सांगूनही बाजार समिती प्रशासन या योजनेला गती देऊ शकलेले नाही. गेल्या पंधरवड्यात बाजार समिती प्रशासनाने डाळिंबाचे ऑनलाइन लिलाव सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी, अद्याप यश आले नसून, काही अडते, शेतकरी आणि खरेदीदारांच्या खांद्याचा वापर करीत ऑनलाइन लिलावाला विरोध करीत असल्याचे वास्तव आहे.

पुणे ः बाजार समित्यांमधील शेतीमाल विक्रीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ऑनलाइन राष्ट्रीय बाजाराची (ई-नाम) अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र पुणे बाजार समितीमध्ये ई-नामची अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. राज्य शासनाने वारंवार सांगूनही बाजार समिती प्रशासन या योजनेला गती देऊ शकलेले नाही. गेल्या पंधरवड्यात बाजार समिती प्रशासनाने डाळिंबाचे ऑनलाइन लिलाव सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी, अद्याप यश आले नसून, काही अडते, शेतकरी आणि खरेदीदारांच्या खांद्याचा वापर करीत ऑनलाइन लिलावाला विरोध करीत असल्याचे वास्तव आहे. यामुळे प्रत्यक्षात ऑनलाइन लिलाव सुरू करण्यात बाजार समितीला यश आलेले नाही. 

शेतीमालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ई-नाम योजना आणली. या योजनेत पहिल्या टप्प्यात अतिनाशवंत नसलेल्या शेतीमालाचा समावेश करण्यात आला. या योजनेत राज्यातील ६० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये पुणे बाजार समितीचादेखील समावेश करण्यात आला. पुणे बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक अत्यल्प असल्याचे कारण देत, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नकारात्मकता दर्शविण्यात आली. मात्र यानंतर राज्य शासन, पणन संचालकांना कारवाईचे संकेत दिल्यानंतर पुणे बाजार समितीने डाळिंबाच्या लिलावाचा फार्स निर्माण केला. डाळिंब अडत्यांना नोटिसा दिल्या. यानंतर १३ जून रोजी लिलाव सुरू करण्याचे सांगण्यात आले. यानंतर १५ जूनची तारीख देण्यात आली. मात्र अद्यापही ऑनलाइन लिलाव सुरू झाले नसल्याचे वास्तव आहे. 

याबाबत अडतदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संकल्पना जरी चांगली असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अवघड आहे. बाजार समितीमधील नियमित खरेदीदारच या लिलावात बोली लावणार आहेत. प्रत्यक्षात राज्यातील नाशिक, नागपूर, मुंबई, सोलापूर, लातूर आदी विविध बाजार समित्यांमधील अडतदारांनी बोली लावणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. पुणे बाजार समितीमध्ये नियमित खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांची नोंदणी जरी ई-नाम पोर्टलवर केली असली तरी, प्रत्यक्षात ऑनलाइन लिलाव होत नाहीत. या प्रक्रियेसाठी बाजार समिती प्रशासन आग्रही असून, त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत राज्यातील विविध बाजार समित्यांमधील डाळिंब खरेदीदारांची बोली लागत नाही तोपर्यंत ही योजना यशस्वी होणे अवघड आहे.  

याबाबत प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, ‘‘ऑनलाइन लिलावासाठीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करावयाचे नियोजन आहे. खरेदीदार, अडते, शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. १७ जून रोजी लिलाव सुरू करायचे नियोजन होते. मात्र काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याने लिलाव झाले नाहीत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून लिलाव सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’

या आहेत त्रुटी 

  • खरेदीदारांकडून थेट शेतकऱ्यांना पेमेंट होण्यास अडचणी 
  • खरेदीदारांकडून बॅंक गॅरंटी नाही.
  • विविध बाजार समित्यांमधील खरेदीदारांकडून बोली नाही.
  • शेतकरी प्रतवारी करून शेतीमाल आणत नाहीत. 
  • शेतीमालाच्या प्रतवारीसाठी मार्गदर्शनाची गरज 
  • प्रशिक्षण देणारे केंद्र सरकारचे अधिकारीच अनभिज्ञ

इतर बातम्या
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...