पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचे लिलाव आॅनलाइन होणार

पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचे लिलाव आॅनलाइन
पुणे बाजार समितीमध्ये डाळिंबाचे लिलाव आॅनलाइन

पुणे ः पणन संचालकांनी कारवाईची नोटीस दिल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) डाळिंबाचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार (ता. ११) पासून डाळिंबाचे लिलाव ऑनलाइन होणार आहेत, अशी माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतींमधून शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी केंद्र शासनाने शेतमालाच्या आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम योजना देशपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेक बाजार समित्या आणि अडतदारांना या योजनेला विरोध करत अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली. यामुळे या योजनेने गती घेतली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्राधान्यक्रम असलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पणन संचालकांनी कठोर पावले उचण्यास सुरवात केली. नुकतीच पणन संचालकांनी या योजनेतील सहभागी बाजार समित्यांचा आढावा बैठक घेत कारवाईचे आदेश दिले होते. 

यानंतर पुणे बाजार समितीने तातडीने डाळिंबाचा ई-नाममध्ये समावेश करत लिलावासाठीची पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बाजार समितीने पहिल्या टप्प्यात गुळाचा समावेश ई-नाममध्ये केला होता. मात्र, अडत्यांनी गुळाच्या दर्जाबाबत खरेदीदार साशंक असल्याचे कारण देत, गुळाचे लिलाव आॅनलाइन करण्यास विरोध केला आहे. मात्र, आता डाळिंब आणि कांदा या शेतमालाचा ई- नाममध्ये समावेश करण्याचा प्राधान्यक्रम बाजार समितीने दिला आहे. यानुसार पहिल्यांदा डाळिंबाचे आॅनलाइन लिलाव मंगळवारपासून सुरू होत असून, याबाबत शेतकरी आणि अडतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अडतदारांना दाखविण्यात आले आहे. बाजार समितीत डाळिंब आणि कांद्यासाठी स्वतंत्र यार्ड असल्याने या ठिकाणी ऑनलाइन लिलाव करणे तुलनेने सोपे आणि शक्य होणार आहे. याचा शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.  - बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे बाजार समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com