Agriculture news in marathi Pomegranate breaks from 'Rohio' in Sangli | Agrowon

सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘ब्रेक’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

‘रोहयो’तून डाळिंबाला मंजुरी दिली नाही; पण जे इच्छुक असतील, नियमाप्रमाणे काम करतील, त्यांना मंजुरी यापुढे दिली जाईल. 
- राहुल जितकर, कृषी अधिकारी, आटपाडी

२०१७ मध्ये लागवडीला मंजुरी मिळालेली असताना ती रद्द केली. रोपे लावण्याअगोदर भेट द्या म्हणून साहेबांना अनेक वेळा भेटलो, पण मुद्दाम आले नाहीत.
- उत्तम बालटे, अशासकीय सदस्य, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, आटपाडी

आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील तालुका कृषी विभागाने ‘रोहयो’तून एकाही डाळिंब लागवडीला मंजुरी दिलेली नाही. तर, दुसरीकडे नेतेमंडळींना पोसण्यासाठीच ‘रोहयो’ची कामे दिली आहेत. त्यामुळे कृषीच्या कामावर प्रश्न निर्माण झाला आहे. 

महसूल विभाग ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला मंजुरी देत होते. तसेच मजुरांचे मस्टर आणि इतर बिलेही काढली जात होती. दोन वर्षांपूर्वी ही कामे कृषीकडे सोपवली आणि ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ब्रेक लागला. तालुक्‍यात नेहमीच डाळिंब लागवड सुरू असते. 

पाच एकरांतील शेतकरी ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला पसंती देतात. तेथे अनुदान जादा मिळते. लागवडीसाठी अनेकांनी कृषीकडे प्रस्ताव सादर केले. काहींना मंजुरीही दिली. मात्र अधिकारी बदलले आणि कामकाजाची पद्धतही बदलली. योजनाच गुंडाळून ठेवली आणी दुसरीच योजना माथी मारली. तेथे अनुदान कमी मिळते.

पावणे दोन वर्षांत एकही मंजुरी ‘रोहयो’तून दिली नाही. उलट पूर्वीची मंजूर कामे बंद केली. रोहयोत गैरव्यवहार होतात. बोगस मजूर दाखवले जातात, अशी कारणे सांगून अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. डाळिंबांची ओळख असलेल्या तालुक्‍यातच ही स्थिती ओढवली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

शेतकऱ्यांना डावलून इतरांना पोसले 

कृषी विभागाने शेतकऱ्यांना डाळिंब लागवडीला मंजुरी दिली नाही. दुसरीकडे मात्र काही नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना औषधी वनस्पती रोपवाटिका आणि इतर कामे दिली आहेत. तेथील गैरव्यवहाराला ते पाठीशी घालतात, असे शेतकऱ्यांचे मत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करून नेते मंडळींचे भले करण्याचे काम कृषी विभाग करत आहे, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...