सोलापूर : डाळिंब केंद्रातर्फे शेतकरी, शास्त्रज्ञांचा गौरव

येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त डाळिंबामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी व शास्त्रज्ञांचा गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
Pomegranate Center honors farmers, scientists
Pomegranate Center honors farmers, scientists

सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त डाळिंबामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी व शास्त्रज्ञांचा गौरव मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.  

पुण्यातील आयसीएआरचे (अटारी) संचालक डॉ. लाखन सिंग, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुवर, मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश आग्रवाल, सोलापूर पोस्टल विभागाचे प्रमुख ए. व्यंकटेश्वरा रेड्डी, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे उपाध्यक्ष प्रताप काटे आणि डाळिंब केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यावेळी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. मराठे यांनी संशोधन केंद्राच्या प्रवासाचा आलेख मांडला. तसेच डाळिंब संशोधन केंद्राच्या योगदानाबद्दल माहिती देणाऱ्या टपाल पाकिटाचे प्रकाशन ही राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रासाठी भूषणावह बाब असून याद्वारे केंद्राचे कार्य सामान्य माणसात प्रसार होण्यास मोठी मदत होईल, अशी आशा डॉ. मराठे यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहुणे डॉ. लाखन सिंग, डॉ. सोमकुँवर यांनी डाळिंब केंद्राने आतापर्यंतच्या कालावधीत केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करत डाळिंब केंद्राचा गौरव केला. सूत्रसंचालन डॉ. नीलेश गायकवाड यांनी केले. तर डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी आभार मानले.

शेतकरी, शास्त्रज्ञांचा सन्मान वर्धापनदिनाचे औचित्य साधून या निमित्ताने डाळिंब उत्पादन व निर्यातीमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल शशिधर हत्तुरे (अक्कलकोट), आबासाहेब तावरे (बारामती), संजय चोपडे (माढा), अमरजीत जगताप (पंढरपूर), प्रकाश सूर्यवंशी (आटपाडी) या शेतकऱ्यांसह डाळिंब केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यालयीन आणि फार्म कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याशिवाय वैज्ञानिक, तांत्रिक, प्रशासकीय विभागामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ. नीलेश गायकवाड (वरिष्ठ वैज्ञानिक), डॉ. प्रकाश पाटील (वरिष्ठ वैज्ञानिक), महादेव गोगाव (वरिष्ठ तांत्रिक सहायक), किरण खाटमोडे (वरिष्ठ लिपिक) यांनाही सन्मानित करण्यात आले.

चर्चासत्रांतून शंका निरसन दुपारच्या सत्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने ऑनलाइन शास्त्रज्ञ - शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात देशभरातून विविध डाळिंब उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक व निर्यातदारांनी आपला सहभाग नोंदविला. या प्रसंगी डाळिंब उत्पादकांच्या विविध शंका आणि प्रश्नांचे निराकरण केंद्रातील विविध विषयांच्या शास्त्रज्ञांकडून करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com