Agriculture news in marathi, pomegranate in Crisis in Sangli | Page 2 ||| Agrowon

सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच यंदाच्या मृग हंगामातील डाळिंब पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी

.- शिवलिंग संख, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघ

मृग हंगामाला वातावरण पोषक असते. परंतु, यंदा पोषक वातावरण नव्हते. तीन वेळा कळी आली, परंतु ती कळी झाडावर राहिली नाही. वीस वर्षांत कधीच मृग बहराने दगा दिला नाही.

- किशोर देशमुख, आटपाडी, जि. सांगली

सांगली : राज्यात डाळिंबाचा सुमारे ४० ते ५० टक्के मृग बहर धरला जातो. परंतु पाण्याची कमतरता आणि पोषक वातावरण नसल्याने मृग हंगामातील डाळिंब धोक्यात आले आहे. हंगामात सुमारे ४० टक्के डाळिंबाचे उत्पादन घटण्याची शक्यता डाळिंब उत्पादकांनी व्यक्त केली आहे. कळीचे सेटिंग झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने पानगळ करून मृग बहर धरण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

राज्यात सुमारे १ लाख ५० हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. दरवर्षी सुमारे ४० ते ५० टक्के म्हणजे ६० हजार ते ७० हजार हेक्टर क्षेत्र मृग हंगामातील डाळिंबाचा बहर धरला जातो. या बहरातील डाळिंब नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान बाजारात विक्रीस येतात. जानेवारी डाळिंबाची निर्यात सुरू होते. त्या दरम्यान, डाळिंबाला सरासरी ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा कल मृग बहरातील डाळिंबाचे उत्पादन घेण्याकडे वाढला आहे. 

जानेवारी ते एप्रिलपर्यंत या महिन्यात वळीव पाऊस झाला नाही. त्यातच शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात शेतकरी टॅंकरने पाणी दिले. यंदाही शेतकऱ्यांनी जोरदार तयारी करून हंगाम धरला. प्रचंड खर्च करून बागा जगविल्या. त्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षा करू लागला. परंतु, यंदा पाऊस झालाच नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणी होते, त्यावर डाळिंबाचा बहर धरला. परंतु त्यानंतर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. तरीदेखील शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देऊन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बहरातील तीन वेळा कळी आली. परंतु, त्याचे सेटिंग झाले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

शेतकऱ्यांनी डाळिंबाला उपलब्ध पाणी देऊन बहर धरला. अनेक ठिकाणी डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. वातावरणात सातत्याने बदल होऊ लागला आहे. परिणामी फुलगळ होण्यास सुरवात झाली असून, फळांचे सेटिंग होत नाही. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचे अखर्चित कोट्यवधी रुपये परत...अकोला : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत...
उजनीतून आष्टी तलावामध्ये पाणी सोडा,...सोलापूर ः उजनी धरणातून सध्या कालवा आणि बोगद्यात...
सेंद्रिय शेती गटांसाठी वाशीममध्ये अर्ज...वाशीम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत...
नागपूर : दीड लाख रुपयांचा एचटीबीटी साठा...नागपूर ः मौदा तालुक्‍यातील अरोली पोलिस...
कृषी सेवा केंद्रधारकांकडून होणारी...अमरावती ः लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेत कृषी...
सातारा जिल्ह्यात साडेसात हजार...सातारा  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
पुणे जिल्ह्यात खरिपासाठी १ लाख १९ हजार...पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा...
नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय...मुंबई  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
प्रत्यक्ष खर्चाचे आणि कर्जाचे पॅकेज...मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १४...पुणे  : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्यानंतर...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग...अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या...
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...