agriculture news in marathi, pomegranate crop damage due to drought, nashik, maharashtra | Agrowon

निफाड, सिन्नर भागांत पाणीटंचाईचा डाळिंब बागांना फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

नाशिक  : निफाड, सिन्नर तालुक्यांच्या सीमालगत भागातील तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर या गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईमुळे काही डाळिंब बागा सुकून गेल्या आहेत, तर जनावरांचा चारा शेतातच करपला आहे. 

नाशिक  : निफाड, सिन्नर तालुक्यांच्या सीमालगत भागातील तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव पाटपिंप्री, सुळेवाडी, केपानगर या गावांमध्ये भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीटंचाईमुळे काही डाळिंब बागा सुकून गेल्या आहेत, तर जनावरांचा चारा शेतातच करपला आहे. 

मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम हातातून गेले. अशातच काही भागांत पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. ओढे, नाले, तलाव वर्षापासून कोरडे पडले आहेत. यामुळे जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे; मात्र काही ठिकाणी फक्त पिण्यापुरते पाणी उपलब्ध आहे. एप्रिल महिन्यात तर विहिरींनी पूर्णपणे तळ गाठला आहे. डाळिंबाच्या बागा जळत असून, जनावरांसाठी शेतात उभा असणारा चारादेखील सुकून गेल्याने चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अनेक गावांमध्ये कूपनलिका बंद झाल्याने पाण्यासाठी टँकरची आवश्यकता असूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. मागणी करूनही पिण्याच्या पाण्याचा टँकर गावात येत नसल्याने पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुष्काळी स्थितीमुळे मेंढ्यांना पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या रानात मेंढ्या बसवल्या जातात तिथेच त्यांचे त्या दिवसासाठी घर बनते. मात्र सध्या पिण्यासाठी पाणी नसल्याने शेतात कुठेही राहता येत नाही. मेंढ्यांचे कळप पाण्यासाठी दिवसभर परिसरात भटकंती करताना दिसत आहे. 

दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम 
दरम्यान, यंदा दुष्काळी स्थितीमुळे निफाड तालुक्यात हिरवा चारा मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागल्याने त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे परिसरात हिरवा चारा उपलब्ध नाही. त्यातच वाढत्या मागणीमुळे सरकी, ढेप यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खर्च वाढत असूनही दुधाचा दर तोच असल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. खर्च आणि उत्पादन यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी दुभती जनावरे विक्री करण्याचा निर्णय घेत आहेत; मात्र सगळीकडे सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांचे दर कमी झाले आहेत.

इतर बातम्या
अमेरिकन लष्करी अळीविषयी जागृती,...मक्यावरील लष्करी अळी (शा. नाव - स्पोडोप्टेरा...
संजीवकांचा वापर संतुलितपणेच व्हावानाशिक : द्राक्षबागेत आवश्यकतेनुसार रासायनिक...
‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना अंदाजपंचे...नाशिक : अंबड परिसरात महावितरणकडून कृषी पंपाचे...
खरीप पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील पीकविमा योजनेला चांगला...
खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प भरलेजळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही...
मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वलरत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र...
निष्पक्ष निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जअकोला ः विधानसभा निवडणुकीच्‍या अनुषंगाने जिल्‍हा...
मेळघाटातील शेतकऱ्यांना जाणून घ्यायचेय...औरंगाबाद : मेळघाटातील शेतकरी मराठवाडा आणि...
निकृष्ट बंधाऱ्याप्रकरणी तिघांवर गुन्हे...गडचिरोली ः चार महिन्यांपूर्वी बांधण्यात...
अनुदानावरील पशुखाद्य पुरवठ्यासाठी उद्या...नागपूर ः पशुखाद्याच्या तुटवड्यामुळे अडचणीत...
पूर्वहंगामी कापूस पिकाला पावसाचा फटकाजळगाव ः खानदेशातील पूर्वहंगामी कापूस पिकाला सततचा...
रयतच्या योगदानातून इतिहास घडेल ः शरद...सातारा: त्यागाचा विचार तत्कालीन पिढीत घडविण्यात...
सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका...नगर  ः दोन वेळचा घास भरवणाऱ्या...
दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची...कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान...
निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच...बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच...
मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळपरभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही...
पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढलापुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे...
द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळीभवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही...
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रिटो...लातूर :  उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी...
गव्हावरील किडीच्या नियंत्रणासाठी सहजीवी...मोंटाना राज्य विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील...