agriculture news in Marathi pomegranate crop damage by rain Maharashtra | Agrowon

हातातोंडाशी आलेल्या डाळिंबावर पाणी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

साडेतीन एकरातील डाळिंबाचा शंभर रुपये प्रति किलो असा दर ठरला होता. सुमारे आठ ते नऊ टन डाळिंबाच उत्पादन हाती लागणार होतं, आठ ते साडे आठ लाख रुपये पहिल्या तोड्याला मिळणार होते.

सांगली ः साडेतीन एकरातील डाळिंबाचा शंभर रुपये प्रति किलो असा दर ठरला होता. सुमारे आठ ते नऊ टन डाळिंबाच उत्पादन हाती लागणार होतं, आठ ते साडे आठ लाख रुपये पहिल्या तोड्याला मिळणार होते. बुधवारी (ता.१४) सकाळी व्यापारी डाळिंबाची काढणी सुरु करणार होते. पण पहाटेच पाऊस पावसाने थैमान घातले. शेतात गुडघ्या इतके पाणी साचले अन्‌ डाळिंब काढायचं थांबलं. आता दोन टनाने उत्पादनात घट होण्याची शक्यता असून फळ कुजव्यानं दरही कमी मिळण्याची भीती आहे, असे गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी लक्ष्मीकांत देशपाडे सांगत होते. 

साडेतीन एकरावर सुमारे एक हजार पन्नास डाळिंबाची झाडं. अगोदरच डाळिंबावर संकटाची मालिका सुरु आहे. त्यातूनही डाळिंबाचा मृग बहार धरला. बाग चांगली फुलली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात बदल झाला, पाऊस सुरु झाला. त्यामुळे फूल, कळी गळ होऊ लागली. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. सुमारे पाच वेळा फळ कुज झालेली दोन ते तीन टन डाळिंब काढून टाकली. त्यातूनही बाग चांगली जोपासली. फळ मोठी झाली. डाळिंब विक्री करण्याचे नियोजन सुरु केले. 

मंगळवारी (ता. १३) व्यापारी शेतात आले. डाळिंबाची पाहणी केली. डाळिंबाचा दर्जा पाहून त्यास प्रति किलोस शंभर रुपये असा दर ठरवला. बुधवारपासून डाळिंबाची काढणी करतो असे सांगून व्यापारी निघून गेले. सुमारे साडेतीन एकरातून आठ ते नऊ टन डाळिंबाचे उत्पादन मिळेल, असा ठाम विश्‍वास होता. या दरानुसार आठ ते नऊ लाख रुपये हाती येतील. पैसे हाती आल्यानंतर शेतीच नियोजन करायचं असं मनात पक्क केलं होतं. 

पण, बुधवारी पहाटेपासून पावसाला सुरवात झाली. बघता बघता दोन दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. शेतात गुघडाभर पाणी साचल. आता काय करायचं असा प्रश्‍न पडला होता. तशाच पावसात सहा किलोमीटरचा पल्ला गाठून मुलांना घेऊन शेतात गेलो. बांध फोडले, पाईप टाकून पाणी काढण्याचा प्रयत्न करु लागलो. पण शेतातील पाणी कमी होत नव्हतं. शेतात तीन दिवसांपासून पाणी आहे. पाणी जास्त असल्यानं डाळिंब पाण्यात बुडाले. त्यामुळे विक्रीला आलेल्या डाळिंबाला फळकुज होणार असल्याने डाळिंबाच्या उत्पादनात दोन टन घट होण्याचा अंदाज आहे. व्यापारी पुन्हा येऊन गेले, त्यावेळी ८० रुपये प्रति किलो दर असा सांगितला. पण शेतात अजूनही पाणी असून ते कमी होण्यास तीन ते चार दिवस जातील. पुन्हा दर खाली येतील की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. 

प्रतिक्रिया
अगोदर दुष्काळाने पिचलो. त्यातून मार्ग काढत डाळिंबाची बाग जगवली. पण निर्सगापुढं हतबल झालो आहे. पावसानं विक्रीला आलेल्या डाळिंबाच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे भरून काढायचे? 
- लक्ष्मीकांत देशपांडे, गोमेवाडी, ता. आटपाडी. 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...