agriculture news in Marathi pomegranate crop insurance date till 14 july Maharashtra | Agrowon

डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत मुदत 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहर २०२१-२२ विमा अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. द्राक्ष, पेरू, लिंबू व चिकूसाठी ३० जून आणि डाळिंबासाठी १४ जुलै २०२१ पर्यंत मुदत आहे.

सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहर २०२१-२२ विमा अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. द्राक्ष, पेरू, लिंबू व चिकूसाठी ३० जून आणि डाळिंबासाठी १४ जुलै २०२१ पर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. 

कर्जदार, बिगर कर्जदारांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणारेही योजनेसाठी पात्र आहेत. फळपिकासाठी ४ हेक्टरपर्यंत मर्यादा आहे. मृग अथवा आंबिया बहरापैकी एकाच हंगामासाठी विमा अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा कवच लागू असेल. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळिंब, द्राक्ष २ वर्षे, पेरू ३ वर्षे, लिंबू ४ वर्षे, व चिकू ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. 

...अशी आहे मुदत 
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरण्यासाठी नव्या आदेशानुसार तारखाही जाहीर करण्यात आल्या असून, त्यात शेतकऱ्यांनी (कर्जदार वा बिगर कर्जदार) योजनेतील सहभागासाठी यंदाच्या मृग बहरासाठी द्राक्षासह संत्रा, पेरू, लिंबू, मोसंबी, चिकू या फळांसाठी ३० जून ही अंतिम तारीख आहे. तर डाळिंबासाठी १४ जुलै ही तारीख आहे. आंबिया बहारासाठी द्राक्षासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी, केळी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू, आंब्यासाठी (कोकण विभाग) ३० नोव्हेंबर अंतिम तारीख असेल. तर इतर जिल्ह्यातील आंब्यासाठी ३१ डिसेंबर आणि डाळिंब, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर ही तारीख अंतिम असेल. 

फळपीकनिहाय संरक्षित रक्कम आणि शेतकरी हप्ता (हेक्टरी) 

पीक संरक्षित रक्कम शेतकरी हप्ता
चिकू ६० हजार ३ हजार 
द्राक्ष ३.२० लाख १६ हजार 
डाळिंब १.३० लाख ६,५०० 
लिंबू ७० हजार ६,३०० 
पेरू ६० हजार ३ हजार

...असा करा अर्ज 
सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी बॅंक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, संबंधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधींशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, ७/१२ खाते उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश- रेखांश पत्र आदी कागदपत्रांसह विहित वेळेत जमा करावे. 

प्रतिक्रिया
योजनेअंतर्गत विहित मुदतीत नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्यांची असून नुकसानभरपाई देण्याची कोणतेही दायित्व शासनावर नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. 
- बसवराज मास्ताळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीनमधील सुधारित तंत्र पोचले...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...