सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या फेऱ्यात

वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग रोग, करपा, फुलकुज आणि फुलगळ अशा विविध समस्या तयार झाल्या आहेत.
pomegranate
pomegranate

सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग रोग, करपा, फुलकुज आणि फुलगळ अशा विविध समस्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील मृग हंगामातील डाळिंबाचे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यात प्रामुख्याने डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. जिल्ह्यात साधारणपणे १० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र असून प्रामुख्याने मृग हंगाम धरला जातो. दोन वर्षांपूर्वी दुष्काळाने शेतकरी पिचला होता. त्यातूनही डाळिंबाच्या बागा टॅंकरने पाणी देऊन वाचविल्या होत्या. गतवर्षी अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे डाळिंबाचा दोन ते तीन वेळा बहार धरला होता. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने डाळिंबाचे सुमारे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटले होते. त्यातही डाळिंबाच्या दरात घसरण झाली होती. परिणामी डाळिंब उत्पादकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता.  गतवर्षी अतिवृष्टीमुळे दुष्काळी पट्ट्यात पाणीसाठा चांगला असल्याने डाळिंब उत्पादकांना यंदा दिलासा मिळाला. मृग हंगामातील बागांची पानगळ वेळेत झाली होती. यंदाच्या एप्रिल महिन्यापासून डाळिंबाचा बहार धरण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले. त्यातही सुरुवातीच्या टप्प्यात पाण्याची उपलब्धता असल्याने डाळिंब पिकांना वेळेत पाणी देता आले.

बदलत्या वातावरणाचा फटका जून महिन्यापासून पाऊस सुरु झाला. त्यातच पावसाचा खंड पडला होता. आर्द्रता वाढली. त्यामुळे फुळकळी लागण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या. करप्याचा प्रादुर्भाव होऊ लागला. फुलकूज होऊ लागली. या साऱ्यामुळे सेटिंग होण्यात अडचणी आल्या. फुलकळी निघत नाही. सध्या डाळिंबाच्या एका झाडाला १० ते १५ फळे लागली आहेत. त्यातील ५ ते ७ फळांवर करपा आणि तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा फटका उत्पादनावर बसण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया यंदा बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंब पिकाला बसला असून विविध रोगांचा प्रादुर्भाव देखील झाला आहे. त्यामुळे डाळिंबाचे ६० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. - विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com