Agriculture News in Marathi Pomegranate cultivation declinedv Thackeray | Agrowon

डाळिंब लागवड घटली 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे पीक म्हणून डाळिंबाची ओळख आहे. राज्यात दर वर्षी सुमारे दहा हजार हेक्टरवर नवीन डाळिंब लागवड होते.

सांगली ः कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणारे पीक म्हणून डाळिंबाची ओळख आहे. राज्यात दर वर्षी सुमारे दहा हजार हेक्टरवर नवीन डाळिंब लागवड होते. मात्र, राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांत अतिवृष्टीचा फटका डाळिंब पिकाला बसल्याने नव्याने होणाऱ्या लागवडीवर परिणाम झाला आहे. लागवडीचा वेग मंदावला आहे. मागील वर्षी (२०२१) सरासरीच्या तुलनेत अवघी पाच टक्केच म्हणजे दोन हजार हेक्टरवर लागवड झाली असल्याची अशी माहिती अखिल भारतीय डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली. 

राज्यात सुमारे १ लाख ७० हजार हेक्टरवर डाळिंब पीक आहे. देशात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादनही महाराष्ट्रात होते. सर्वाधिक लागवड सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. राज्यात दर वर्षी नवीन लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येतात. सरासरी दर वर्षी अंदाजे दहा हजार हेक्टरवर नव्याने लागवड होत असते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांत डाळिंब उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ लागली आहे. त्यातच बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावर तेलकट, मर, कुजवा आणि पीन होल बोअर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय उत्पादन खर्चही मिळणे कठीण बनत चालले आहे. त्यामुळे शेतकरी डाळिंब लागवडीसाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. 

डाळिंबावर सातत्याने येणारी नैसर्गिक संकटे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी नवीन लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे डाळिंब संघाने सांगितले आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातच नव्या डाळिंबाची काही प्रमाणात लागवड झाली आहे. वास्तविक पाहता, गेल्या वर्षीपासून राज्यात लागवडीचा वेग मंदावला असून, गतवर्षी राज्यात अवघी पाच टक्केच म्हणजे फक्त दोन हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड झाली आहे. 

गुजरात, राजस्थानात 
लागवड वाढण्याची शक्यता 

गुजरात, राजस्थानमध्ये दर वर्षी सरासरी तीन हजार हेक्टरने नवीन डाळिंबाची लागवड होत असते. या दोन राज्यात गेल्या दोन ते वर्षांपासून डाळिंबाला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी नवीन लागवडीसाठी पुढे येत आहेत. यंदा गुजरात, राजस्थान या राज्यात सहा हजार हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे. 

प्रतिक्रिया 
सलग तीन ते चार वर्षे अतिवृष्टीचा फटका डाळिंबाला बसला आहे. रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खर्च ही वाढला आहे. त्यामुळे डाळिंब लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. त्याचा परिणाम नवीन डाळिंब लागवडीवर झाला आहे. 
-प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...