सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब मातीमोल

कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. यावर घरखर्च व कर्जाचा हप्ता जात होता. मात्र वाऱ्याने मोठे नुकसान झाले. घरावरील पत्रे उडाल्याने निवारा हरवला. आता जगायचं कस? – बापू दळवी, शेतकरी, पांगरी, ता. सिन्नर शेतीतून मिळालेले पैसे डाळिंब बाग जगवण्यासाठी खर्च केले. ३ ते ४ लाख रुपयांचे पाणी विकत घेतले. मात्र गारपिटीने तोंडाशी आलेला घास हिसकाविला. त्यामुळे सर्व कष्ट, खर्च मातीमोल झाला. - मोहन दराडे,डाळिंब उत्पादक, खोपडी खुर्द, ता. सिन्नर
सिन्नर तालुक्यात डाळिंब मातीमोल
सिन्नर तालुक्यात डाळिंब मातीमोल

नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुक्यात दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. गावोगावी पाण्याचे टँकर सुरू आहेत. दुष्काळामुळे अगोदरच शेकडो एकरांवरील डाळिंब बागांचे सरपण झाले आहे. त्यातही शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जगविण्यासाठी गुंतवले आहे. त्यासाठी लाखो रुपयांचे पाणी विकत घेतले. त्यातच अवकाळी पावसाने तालुक्यात बागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सांगवी, सोमठाणे, उजनी, दहिवडी, महाजनपूर, खोपडी, दातली, वावी, पांगरी, शहा, पांचाळे, मिरगाव, खंबाळे, भोकणी, रामपूर, पिंपळगाव, नांदूर शिंगोटे, चास नळवाडी या गावांमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. 

भोजापूर खोऱ्यासह पूर्व भागात पावसाने १०० एकरांहून अधिक डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. काढणीस आलेल्या डाळिंबाचे गारपिटीमुळे नुकसान झाले. फळे मोठ्या प्रमाणावर फुटली आहेत. शेतकऱ्यांनी झाडावर आच्छादन म्हणून ब्रोकव्हरचा वापर केला होता. ते आच्छादनही फाटले आहे. त्यामुळे खर्च वाया गेला आहे. डाळिंब उत्पादकांचे अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कुक्कुटपालकांचेही नुकसान  कुक्कुटपालन व्यवसायाचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. पांगरी येथील शेतकरी बापू सोपान दळवी यांच्या घरासह शेजारील छोट्या स्वरूपाच्या पोल्ट्रीतील १५० हून अधिक पक्षी वादळात उडाले, काही मृत झाले. मिरगाव येथील पोल्ट्री व्यावसायिक प्रकाश शेळके यांच्या पाच हजार कोंबड्यांच्या तीन शेडवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे ६०० पक्षी मृत झाले. त्यांचे ८ ते ९ लाखांपर्यंत नुकसान झाले. प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दाखल घेतली नाही. पंचनामे प्रलंबित आहेत. सरकारने मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com