Agriculture news in marathi The pomegranate dealers in Sangola rebounded | Agrowon

सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा गंडवले

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जानेवारी 2020

सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका व्यापाऱ्याचे डाळिंब ठरवलेल्या ठिकाणी न पोचवता ट्रकचालकाने परस्पर विकल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जवळपास २४ हजार किलो डाळिंब परस्पर विकून सुमारे २२ लाख तीन हजार रुपये किमतीचा अपहार केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाळिंब व्यापाऱ्यांची ट्रकचालकांनी फसवणूक केल्याची जानेवारी महिन्यातील तिसरी घटना असून, यामुळे शेतकरी, व्यापारी धास्तावले आहेत. 

सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका व्यापाऱ्याचे डाळिंब ठरवलेल्या ठिकाणी न पोचवता ट्रकचालकाने परस्पर विकल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. जवळपास २४ हजार किलो डाळिंब परस्पर विकून सुमारे २२ लाख तीन हजार रुपये किमतीचा अपहार केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डाळिंब व्यापाऱ्यांची ट्रकचालकांनी फसवणूक केल्याची जानेवारी महिन्यातील तिसरी घटना असून, यामुळे शेतकरी, व्यापारी धास्तावले आहेत. 

मेजर मुलकसिंग (रा. स्पेरहरी, जि. पटियाला, पंजाब), रामपाल (रा. रताखेडा, जि. फतेहबाद, हरियाना) ट्रकचालक हरप्रीत सिंग (रा. चंदरकल्याण थाना, जि. फतेहबाद, हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, शशिकांत विठ्ठल येलपले (रा. यमगर मंगेवाडी, ता. सांगोला) हे डाळिंबाचा व्यापार करतात. 

१५ जानेवारीला शशिकांत येलपले यांनी त्यांच्या ज्ञानराज कृषी ट्रान्सपोर्ट सांगोला येथून ट्रकमधून (पीबी १३ बीए २६६६) २० लाख ६० हजार रुपये किमतीचे २४ हजार ०८१ किलो डाळिंब वाहनात भरून त्रिपुरा येथील कोयलासर येथे मुलकसिंग, रामपाल, हरप्रीत सिंग यांना विक्रीसाठी पाठवले होते. डिझेलसाठी एक लाख ४३ हजार रुपये दिले होते. 

परंतु, संशयितांनी ट्रकमध्ये भरलेले डाळिंब कोयलासर येथे न पोचविता त्यांची परस्पर विक्री केली. त्यानंतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने अखेरीस येलपले यांनी पोलिसात फिर्याद दिली.

महिन्यातील तिसरी घटना

सांगोला तालुक्‍यात जानेवारी महिन्यातील अशा पद्धतीची तिसरी घटना आहे. या प्रकाराने डाळिंब व्यापारी, शेतकऱ्यांत अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये भीती बसली आहे. त्यामुळे डाळिंब निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...