पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात निर्यात 

Pomegranate exports to Europe from Purandar taluka
Pomegranate exports to Europe from Purandar taluka

गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील विराज + पृथ्वीराज निगडे या बंधूंनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे. त्याअंतर्गत त्यांनी सलग पाचव्या वर्षी डाळिंबाची युरोपात निर्यात केली आहे. 

पुरंदर तालुक्‍यातील राख, गुळुंचे आणि कर्नलवाडीमधून काही जण डाळिंबाचे पीक घेतात. देशाबरोबर परदेशातही डाळिंबाला मोठी मागणी वाढत आहे. विषमुक्त डाळिंबांना मागणी असल्याने तसे उत्पादन ते घेत आहेत. यंदा 

पृथ्वीराज निगडे व विराज निगडे बंधूंच्या डाळिंबांना युरोपच्या बाजारातील मानांकन प्राप्त झाले आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांची डाळिंबे युरोपच्या बाजारात दाखल होत आहेत. इंग्लंड, फिनलंडसारख्या देशांमधून या डाळिंबांना चांगलीच मागणी आहे. 

दरम्यान, डाळिंब पिकासाठी त्यांनी नीरा डाव्या कालव्यावरून दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या कर्नलवाडीपर्यंत पाणी नेले. जिद्द, चिकाटीच्या जोरावर तसेच शेतीविषयक ज्ञानाच्या आधारावर त्यांनी दुष्काळी भागात चांगले उत्पादन मिळविल्याने त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

यंदा पाऊसकाळ जास्त झाल्याने डाळिंबाचे पीक घेणे अत्यंत कठीण गेले. भरपावसात औषध फवारणी करण्याबरोबरच झाडे जगवण्यासाठी कसरत करावी लागली. अखेरच्या काळात निसर्गाने साथ दिल्याने आमचे उत्पादन युरोपच्या मानांकनासाठी योग्य ठरल्याने आम्हाला मोठा आनंद झाला. यातून आम्हाला चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे.  — विराज निगडे, प्रगतिशील शेतकरी, कर्नलवाडी (ता. पुरंदर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com