देवळा तालुक्यातील डाळिंब उत्पादक पीक विम्यापासून वंचित

देवळा तालुक्यातील डाळिंब उत्पादक पीक विम्यापासून वंचित
देवळा तालुक्यातील डाळिंब उत्पादक पीक विम्यापासून वंचित

नाशिक : २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तालुक्यातील देवळा व उमराणे मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. मात्र, कमी अधिक पर्जन्यमान असल्याचे कारण पुढे करत लोहणेर महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवल्याने येथील डाळिंब उत्पादकांनी शुक्रवार (ता.१३) तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांना तहसीलदारांच्या दालनात घेराव घालून पीक विमा मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.  डाळिंबाचे पीक बाधित झाल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यात पीक विमा काढूनही संबंधित कंपनीने डावलल्यामुळे शेकडो डाळिंब उत्पादक अडचणीत सापडले आहेत. लोहणेर महसूल मंडळातील विठेवाडी, सटवाईवाडी, झिरेपिंपळ, लोहणेर, खालप परिसरातील जवळ जवळ ६०० डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असताना नेमून दिलेल्या कंपन्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.  शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शेतकरी मित्र बिंदू शर्मा यांनी डाळिंब उत्पादकांना पीक विम्याची पै अन् पै मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. या वेळी विडेवाडी, लोहणेर, सटवाईवाडीचे शेतकरी उपस्थित होते. या वेळी स्वाभिमानी     शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक कुबेर जाधव ,शेतकरी मित्र बिंदू शर्मा, सुधा बापू पाटील, दादा सूर्यवंशी, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष विनोद आहेर. शशी निकम, गोविंद आहेर यांसह डाळिंब उत्पादक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com