नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर सर्वसाधारण

Pomegranate incoming decline in Nashik; Rates General
Pomegranate incoming decline in Nashik; Rates General

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५३४९ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवक घटली आहे. मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर आहेत. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ४५०० व मृदुला वाणास ५०० ते ७१२५ प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले. आवक १०३४ क्विंटल झाली. दर ३००० ते १००२१ रुपये प्रतिक्विंटल होते. आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली. बटाट्याची  ७८५८ क्विंटल आवक झाली. त्यास ९०० ते १६५० प्रतिक्विंटल दर मिळाला. लसणाची आवक २३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५०० ते १७५०० रुपये दर मिळाला. आल्याची आवक १९९ क्विंटल झाली. त्यास ४००० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची जास्त झाल्याने दरसुद्धा कमी-जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ११०९८ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० दर मिळाला. घेवड्याला १२००  ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ८२७ क्विंटल झाली. मागणी कमी असल्याने दरात घट झाली. लवंगी मिरचीला ९५० ते १५००, तर ज्वाला मिरचीला ८०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला.  वाटाण्याची आवक १६५० क्विंटल झाली. त्यास २००० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

चालू सप्ताहात फळभाज्यांची आवक कमी झाली. दरात चढउतार दिसून आला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ६५ ते १५०, वांगी २०० ते ४५०, फ्लॉवर १२५ ते २२५ असे प्रति १४ किलोस दर मिळाले. कोबी १०० ते १५० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १५० ते ३०० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ३० ते १२५, कारले २०० ते ३५०, गिलके ७५ ते १४०, भेंडी ३०० ते ३८५ असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १०० ते ३००, लिंबू १६० ते ३००, दोडका १४० ते २२५ असे प्रति २० किलोस दर मिळाले. भुईमुगाची आवक ४३ क्विंटल झाली. त्यास ४८०० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

फळांमध्ये चालू सप्ताहात पपईची आवक १४५ क्विंटल झाली. तिला १००० ते २८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. बोरांची आवक १०४२ क्विंटल झाली. त्यास १८०० ते ४००० दर मिळाला. सीताफळाची आवक १३७ क्विंटल झाली. त्यांना १८०० ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक ६८५ क्विंटल, तर दर ५०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक १३८ क्विंटल झाली. तिला ३००० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com