agriculture news in marathi Pomegranate incoming increase in Nashik; Under pressure | Agrowon

नाशिकमध्ये डाळिंबांची आवक वाढली; दर दबावात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 जुलै 2021

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक १०,२४४ क्विंटल झाली. आवक वाढल्याने दर दबावात असल्याचे दिसून आले. मृदुला वाणास ३०० ते ८,५०० तर सरासरी ५७५० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक १०,२४४ क्विंटल झाली. आवक वाढल्याने दर दबावात असल्याचे दिसून आले. मृदुला वाणास ३०० ते ८,५०० तर सरासरी ५७५० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले. आवक १२४७९ क्विंटल झाल्याने दरात घसरण दिसून आली. त्यास प्रतिक्विंटल ४५० ते १८११, तर सरासरी दर १३७० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५१८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते १४००, तर सरासरी दर ७६० रुपये राहिला. लसणाची आवक १३८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २७०० ते ८५००, तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. आल्याची आवक ९४८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५००, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यामुळे बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ३७७६ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० तर सरासरी दर २८०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ५००० ते ६००० तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक २११६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० तर सरासरी दर २२०० रुपये दर राहिला.

गाजराची आवक ४६८क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० तर सरासरी दर २००० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते ३२५ तर सरासरी २२०, वांगी १०० ते २१०, तर सरासरी १५० व फ्लॉवर ८० ते १४० सरासरी १२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १३० ते २३५ तर सरासरी १८० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १५० ते २५० तर सरासरी दर २२० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २२५ तर सरासरी १७०, कारले १२५ ते २२० तर सरासरी १५५, गिलके २५० ते ४०० तर सरासरी ३२५, दोडका ३०० ते ६०० तर सरासरी दर ४५० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला १२५ ते २७५, तर सरासरी १७५ रुपये असे २० किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १२७० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १२५० तर सरासरी दर १००० रुपये दर मिळाला. 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...