Agriculture news in marathi pomegranate insurance came to 31 crore In Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात डाळिंबांच्या विम्याचे ३१ कोटी आले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलुस आणि खानापूर तालुक्‍यातील डाळींब उत्पादक १२ हजार ३४३ शेतकऱ्यांना ३१ कोटी ३८ लाख रूपयांची विमा रक्कम मिळणार आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल.

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलुस आणि खानापूर तालुक्‍यातील डाळींब उत्पादक १२ हजार ३४३ शेतकऱ्यांना ३१ कोटी ३८ लाख रूपयांची विमा रक्कम मिळणार आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक २३ कोटी २४ हजार रुपये, तर पलूस तालुक्‍यात सर्वात कमी ४० हजार ७०० रूपये विमा रक्कम प्राप्त झाली आहे. 

दुष्काळ, अवकाळी पाऊस या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्या खालोखाल तासगाव, खानापूर आणि पलूस तालुक्‍यातही डाळींब उत्पादन घेतले जाते. डाळींब उत्पादकांसाठी १४७ कोटी ९ लाख रुपये विमा संरक्षित करण्यात आला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ३५ लाख रुपयांचा हप्ता भरला होता.

जिल्ह्यातील १२ हजार १५६ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. १२ हजार ३४३ शेतकऱ्यांना 
पीक विमा रकमेची प्रतिक्षा होती. त्यानुसार विम्याचे ३१ कोटी ३८ लाख रुपये जिल्हा बॅंकेकडे जमा झाले आहेत. सध्या ‘कोरोना'मुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशावेळी विमा रक्‍कमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

डाळींब उत्पादकांना मिळणारी भरपाई 

तासगाव तालुका ११ लाख ७५ हजार रूपये 
पलुस तालुका ४० हजार ०६ रूपये 
जत तालुका ६ कोटी ७९ लाख रूपये 
कवठेमहांकाळ १ कोटी ४६ लाख रूपये
आटपाडी २३ कोटी ७४ लाख रूपये
खानापूर १ लाख १६ हजार रूपये 

 


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...