जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १०) डाळिंबाची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २१०० ते ४८०० रुपये दर मिळाला. धुळे, औरंगाबाद, जालना, नाशिक भागातून आवक होत आहे. ही आवक मागील दीड महिन्यापासून टिकून असल्याची माहिती मिळाली. 

बाजारात गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. कूस असलेल्या गवारीला चांगला उठाव राहिला. गवारीला प्रतिक्विंटल ४२०० रुपये दर मिळाला. संकरित प्रकारच्या गवारीला २५०० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहिला. आवक जामनेर, पाचोरा, यावल आदी भागातून होत आहे. 

कोथिंबिरीची १३ क्विंटल आवक झाली. दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बिटची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबूची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८५० ते २४०० रुपये दर राहिला. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २४०० रुपये दर मिळाला. आल्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ५१०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर मिळाला. 

बटाट्याची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये दर होता. भेंडीची १३ क्विंटल आवक तर, दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये मिळाला. गंगाफळाची ३५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ७०० ते ९०० रुपये होता. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर होता. कोबीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १९०० ते ३००० रुपये मिळाला. गाजराची १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते ११०० रुपये दर मिळाला. 

कारल्याची दोन क्विंटल आवक झाली. कमाल दर प्रतिक्विंटल २५०० रुपये मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २४०० ते ४००० रुपये दर राहिला. लाल कांद्याची ४५० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ८०० ते २०५० रुपये मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com