हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा; दर स्थिर
नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ७०१ क्विंटल झाली. आवक वाढली आहे. यासह दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ७०१ क्विंटल झाली. आवक वाढली आहे. यासह दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मृदुला वाणास १००० ते १२०००, तर सरासरी ९००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
चालू सप्ताहामध्ये पोळ कांद्याची आवक वाढल्याचे दिसून आले. आवक ८७६१ क्विंटल झाली. दरांत घसरण झाल्याचे दिसून आले. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते २६५०, तर सरासरी दर २१०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९४७१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १३५०, तर सरासरी दर ११५० रुपये राहिला. लसणाची आवक ७९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३१०० ते ८७५०, तर सरासरी दर ६५०० रुपये राहिला. आल्याची आवक ४४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५००, तर सरासरी दर २००० रुपये राहिला.
सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यात बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. घेवड्याची आवक ४०३६ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २४०० ते ४१००, तर सरासरी दर ३३०० रुपये राहिला.
फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते २२५, तर सरासरी १५०, वांगी १०० ते २५०, तर सरासरी २०० व फ्लॉवर १५० ते ३५० सरासरी २२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर, कोबीला २५ ते ४० तर सरासरी ३० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १०० ते १८०, तर सरासरी दर १२५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.
- 1 of 70
- ››