नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही टिकून

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही टिकून
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली, दरही टिकून

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ११६६७ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले, त्यासाठी आवकेच्या तुलनेत वाढ झाली असून बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ५००० व मृदुला वाणास ५०० ते १०००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली तसेच परपेठेत मागणी वाढल्याने असल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक ३७७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० दर मिळाला. तर घेवड्याला ३५०० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

या सप्ताहात वाळपापडी घेवड्याची आवक कमी झाल्याने मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक १८९६ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ३५०० ते ४५०० तर ज्वाला मिरचीला २५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वाटाण्याची आवक १७१ क्विंटल झाली. त्यास ६००० ते ८००० प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याची आवक १७२४० क्विंटल झाली. बाजारभाव १३०० ते २३०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक १०१३७ क्विंटल झाली. बाजारभाव ६०० ते १२००  प्रतिक्विंटल होते. लसूणाची आवक १०८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते १२००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची आवक २४८ क्विंटल झाली. त्यास १२००० ते १७७०० प्रतिक्विंटल दर मिळाला. 

चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभावात सुद्धा चढउतार दिसून आली. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ४५०, वांगी ४५० ते ७५०, फ्लॉवर ११० ते २६० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११५ ते २९० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १७० ते २५० असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ८० ते १२५, कारले १८० ते २५०, गिलके ३०० ते ५००, भेंडी १८० ते ४८० असे प्रति १२ किलोस दर मिळाले तर काकडीला  १०० ते २५०, लिंबू  ३०० ते ८००, दोडका ३०० ते ५०० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ११०० ते ८६००,  मेथी ११०० ते ३५००, शेपू ६०० ते २५००, कांदापात ३६०० ते ५०००, पालक १७० ते ३००, पुदिना ११० ते २३० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले.  फळांमध्ये चालू सप्ताहात पपईची आवक १२० क्विंटल झाली. बाजारभाव १००० ते २५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक ६५५ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com