नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी; बाजारभाव स्थिर

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी; बाजारभाव स्थिर
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक कमी; बाजारभाव स्थिर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक कमी झाली असून, बाजारभाव स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मागील आठवड्याच्या तुलनेत डाळिंबाची आवक कमी झाली. चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५४३६ क्विंटल झाली. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५४० ते ३४५० रुपये व मृदुला वाणास ६०० ते ५६२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

चालू सप्ताहात हिरवी मिरचीची आवक १२२४ क्विंटल झाली. परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ दिसून आली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रूपये दर मिळाला; तर ज्वाला मिरचीला २५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वालपापडी/घेवड्याची आवक ३६९४ क्विंटल होती. आवक कमी झाल्याने व परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाली. वालपापडीस ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला; तर घेवड्याला ५००० ते ६००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला. 

सप्ताहात गाजराची आवक १९२९ क्विंटल झाली. त्यास १००० ते १३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक सर्वसाधारण होती. एकूण ५३३ क्विंटल आवक झाली. त्यास ३५०० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. फळांमध्ये मोसंबीची आवक ६३५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३००० दर मिळाला. संत्रीची आवक ५४० क्विंटल झाली. तिला १५०० ते ३३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक ३८० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० प्रतिक्विंटल दर मिळाला. पपईची आवक ६० क्विंटल झाली. तिलाही ५०० ते ११०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त राहिले. टोमॅटोला १०० ते ३८०, वांगी १२५ ते ३००, फ्लॉवर ९० ते ३१० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते १९० असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २५० ते ४५० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ६५ ते २००, कारले ४०० ते ७००, गिलके १८० ते ३५०, भेंडी ४०० ते ४८० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला २५० ते ५००, लिंबू ६०० ते १००० असे प्रति २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर १००० ते ४१००, मेथी ७०० ते २०००, शेपू ५०० ते १५००, कांदापात ९०० ते २७००, पालक १८० ते ३५०, पुदिना १०० ते २००, मुळा १२ ते २३ असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले. इतर पालेभाज्यांचा तुलनेत कोथिंबिरीच्या दरात तेजी होती. कांद्याची आवक १०४८३ क्विंटल आवक झाली. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक १२६४४ क्विंटल झाली. बाजारभाव ७०० ते १४०० प्रतिक्विंटल होते. मागील आवकेच्या तुलनेत आवकेमध्ये चढ उतार असून दरातही चढ उतार सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com