नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात सुधारणा, आवक स्थिर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक अवघी ११२ क्विंटल झाली. आवक घटल्याने दरात सुधारणा झाली.
Pomegranate in Nashik Rate improvement, steady inflows
Pomegranate in Nashik Rate improvement, steady inflows

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक अवघी ११२ क्विंटल झाली. आवक घटल्याने दरात सुधारणा झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल २००० ते ९०००, तर सर्वसाधारण ६५००, मृदुला वाणास ३००० ते १६५००, तर सर्वसाधारण १२००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये पोळ कांद्याची आवक स्थिर राहिली. आवक ६९८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५००, तर सरासरी दर २४००, बटाट्याची आवक ११५५२ क्विंटल, दर ७५० ते १३००, सरासरी १००० रुपये, लसणाची आवक २१२ क्विंटल, दर २६१० ते ८५००, तर सरासरी ६००० रुपये, आल्याची आवक ४९४ क्विंटल, दर १००० ते २५००, सरासरी १८०० रुपये राहिला. 

फळभाज्यांची आवक कमी, जास्त झाली. वालपापडी-घेवड्याची आवक ४७८१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ८०० ते २३००, सरासरी दर १५०० रुपये, घेवड्याला ५०० ते २५००, तर सरासरी दर १७०० रुपये राहिला. हिरव्या मिरचीची आवक १०६१ क्विंटल, तर दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ३५००, सरासरी दर २७०० रुपये, गाजराची आवक १७९७ क्विंटल, दर ६०० ते १५००, सरासरी १००० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते १२०, सरासरी ८०, वांगी १५० ते ३१०, सरासरी २२० व फ्लॉवर ७० ते १७५ सरासरी ३१० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ५० ते १४०, तर सरासरी १००, कारले २१० ते ४२०, सरासरी ३१०, भेंडी १५० ते २७०, सरासरी २१० व दोडका ३०० ते ५४० तर सरासरी दर ४३० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला ३०० ते ५३०, सरासरी ४१० रुपये २० किलोस दर मिळाले.

फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ५१० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १०००, तर सरासरी दर ७०० रुपये, पपईची आवक ६५ क्विंटल, २००० ते ३५००, तर सरासरी दर ३००० रुपये, मोसंबीची आवक १६० क्विंटल, दर २२०० ते ४०००, सरासरी ३३०० रुपये मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com