agriculture news in Marathi pomegranate producers in trouble after rate up Maharashtra | Agrowon

दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब उत्पादकांना फटका 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जानेवारी 2021

देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा डाळिंबाला १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. गेल्या वर्षी हाच दर ३० ते ८० रुपये होता.

सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा डाळिंबाला १५० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. गेल्या वर्षी हाच दर ३० ते ८० रुपये होता. यंदा दर चांगला मिळाला असला तरी पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान होऊन खर्चही तिप्पट झाला. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

देशात डाळिंबाचे २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख २५ हजार हेक्टरवर मृग बहर धरला जातो. मात्र यंदाच्या ऐन हंगामाच्या वेळी सतत पाऊस झाला. वातावरणात बदल झाला. याचा फटका मृग हंगामातील डाळिंबाला बसला. परिणामी, फुलगळ, फळकुज मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे मालाचा दर्जा घसरला. बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तिप्पट खर्च करावा लागला. खर्च करून देखील डाळिंबाच्या उत्पादनात सुमारे ८० ते ८५ टक्क्यांनी घटले. 

नैसर्गिक आपत्तीमुळे डाळिंबाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे डाळिंबाच्या दरात सुधारणा होऊ लागली. हंगामाच्या प्रारंभी डाळिंबास प्रति किलोस १०० रुपयांपासून दर मिळू लागले. हळूहळू डाळिंबाच्या दरात वाढ झाली असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. गतवर्षी याच हंगामातील डाळिंबास प्रति किलोस ३५ ते ८० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. यंदा डाळिंबास गतवर्षीपेक्षा चांगले दर मिळाले असले, तरी डाळिंब शेतीस घातलेला खर्चाचा ताळमेळ कसातरी बसला असून, ज्या शेतकऱ्यांच्या हाती डाळिंबाचे उत्पादनच मिळाले नाही, त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 
.. 
देशातून मृग, अंबिया आणि हस्त या तीन बहारांतील डाळिंबाची सुमारे ७८ हजार टन डाळिंब निर्यात होते. यंदाच्या हंगामातील मृग बहरातील डाळिंब युरोपसह आखाती देशात आजअखेर २०० ते २५० टन निर्यात झाली आहे. अजून २०० ते २५० टन निर्यात होण्याची शक्यता असल्याचे डाळिंब अखिल भारतीय डाळिंब संघाच्या सूत्रांनी सांगितले. 

निर्यात डाळिंबाचे दर १०० रुपयांनी वाढले 
देशातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. गतवर्षी निर्यातक्षम डाळिंबास १०० ते १२० रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. यंदा निर्यातक्षम डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे १३० रुपयांनी दरात वाढ झाली आहे. सध्या या डाळिंबास २५० रुपये मिळत आहेत. 

डाळिंब उत्पादन आणि दर (रुपये/किलो) 
१५० ते २५० 
स्थानिक डाळिंब 
२५० 
निर्यातीचा दर 
२०० ते २५० टन 
आतापर्यंत निर्यात 

राज्यनिहाय डाळिंब उत्पादन अंदाजे (टनांत) 
महाराष्ट्र 

२०१९-२० : १५ लाख 
२०२०-२१ : ५ लाख 

गुजरात 
२०१९-२० : ३ लाख 
२०२०-२१ : १.५ लाख 

कर्नाटक 
२०१९-२० : ५ लाख 
२०२०-२१ : २ लाख 

राजस्थान 
१९-२० : २ लाख 
२०-२१ : १.५ लाख 

आंध्र प्रदेश 
१९-२० : २ लाख 
२०-२१ : १ लाख 

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी पावसातून बागा वाचविण्यासाठी धडपड केली. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आले, पण उत्पादकता घटली. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. 
- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...