डाळिंब उत्पादनात योग्य जातीच्या रोपांची निवड महत्त्वाची : हिरे

डाळिंब उत्पादनात योग्य जातीच्या रोपांची निवड महत्त्वाची : हिरे
डाळिंब उत्पादनात योग्य जातीच्या रोपांची निवड महत्त्वाची : हिरे

नाशिक  : डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे डाळिंब बागा कमी झाल्या आहेत. मात्र, अलीकडील काळात पुन्हा बागांच्या लागवडी वाढत आहे. सध्याच्या परिस्थितीत कसमादे पट्ट्यातील डाळिंबाच्या फळ पिकाला पुन्हा चांगले दिवस येतील. यासाठी डाळिंब उत्पादनात योग्य जातीच्या रोपांची निवड महत्त्वाची आहे , असे प्रतिपादन डाळिंब संशोधन केंद्र लखमापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन हिरे यांनी केले.  सकाळ अग्रोवन आयोजित अँग्रो संवाद कार्यक्रमांतर्गत दर्जेदार डाळिंब उत्पादन तंत्र व पाणी व्यवस्थापन'' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मालेगांव तालुक्यातील दाभाडी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी  डॉ. हिरे म्हणाले, देशांतर्गत विक्रीपेक्षा निर्यातीवर भर देण्यात यावा. त्या पद्धतीने डाळिंब बागेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रक्रिया उद्योगावर भर देण्यात यावा. प्रामुख्याने उत्पादनाचा खर्च कमी केल्याने अधिक फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ निकम होते. ड्रीप इंडिया कंपनीचे व्यवस्थापक किरण नेने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जलसमृद्धी योजनेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक येथील प्रगतिशील शेतकरी दिगंबर निकम यांनी देण्यात आले. कार्यक्रमासाठी जाहिरात व्यवस्थापक विजय म्हसदे, वितरण प्रतिनिधी सुनील रौदळ, मंगेश निकम, हरी निकम, दिलीप निकम, मोहन मानकर, पोपट निकम यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com