agriculture news in marathi, pomegranate prodution in trouble, sangli, maharashtra | Agrowon

राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीत
अभिजित डाके
गुरुवार, 20 जून 2019

यंदा डाळिंब हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबाची पक्व काडी कमकुवत झाली असल्याने पुरेसे अन्नद्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घटणार आहे.   
- किशोर देशमुख, डाळिंब उत्पादक, आटपाडी, जि. सांगली.

सांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार हेक्टर आहे. त्यापैकी मृग बहरात ४० टक्के डाळिंब उत्पादन घेतले जाते. परंतु दुष्काळी स्थिती आणि पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाचा बहर धरला आहे. यंदा हंगाम एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्यता असून, पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

राज्यात डाळिंबाचा मृग, हस्त आणि आंबे बहर धरला जातो. मृग बहर घेण्यासाठी शेतकरी नियोजन करीत आहेत. राज्यातील अनेक भागात सिंचन योजना आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय आहे, अशाच शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहर धरला आहे. परंतु दिवसेंदिवस पाण्याची समस्या तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब बागांना टॅंकरने पाणी देण्यास सुरवात केली आहे. परंतु १२ हजार लिटरच्या टॅंकरसाठी ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. मात्र टॅंकरने पाणी देण्यासाठी जवळपास कुठेही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, मृग बहरावर संकट आले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर डाळिंबाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपब्धतेनुसार हा बहर धरला आहे. त्यांना सातत्याने ढगाळ हवामान, वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यातच पाणी कमी पडत असल्याने कळी निघत नाही. त्याच बरोबर पानांचा आकारदेखील लहान झाला आहे. या सर्व घटकांचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून, उत्पादन कमी मिळाले तर आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने बाग वाचविण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादकांनी केली आहे. 

‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही’
२०१३ मध्ये भीषण दुष्काळ होता. याचा परिणाम फळबागांवर होऊ लागला होता. पाणी नसल्याने बागा सोडून दिल्या होत्या. मात्र तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेतून फळ बागांसाठी हेक्टरी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले होते. त्यामुळे केवळ बागा जगविण्यासाठी आधार मिळाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. मात्र या सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 
 
२५ टक्के बागांचे झाले सरपण
गेल्या वर्षी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. वळवानेही दगा दिला. त्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. उपसा सिंचन योजना सुरू आहेत. परंतु धरणांमध्ये पाणी नसल्याने या योजनाही बंद होऊ लागल्या आहेत. राज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातूनही काही शेतकरी डाळिंब बागा जगवत आहेत. मात्र पाणी नसल्याने अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील सुमारे २५ टक्के बागा पाण्याविना जळून गेल्या आहेत. 
 

यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. फळबागा या बहुवार्षिक आहेत. बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च आहे. अशा परिस्थितीत शासनाने फळबागांसाठी तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे, असे महाऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोशिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी सांगितले.

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...