agriculture news in marathi, Pomegranate rate hike in nagar district | Agrowon

नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. १७) काही प्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली. डाळिंबाला सरासरी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ३० ते ४० रुपये रुपये प्रतिकिलो होता. डाळिंबांची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याच्या डाळिंब खरेदीदार सांगत आहेत. एकट्या नगर बाजार समितीत आतापर्यंत सुमारे ४५ हजार क्विंटल डाळिंबाची आवक झालेली पंचवीस कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. १७) काही प्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली. डाळिंबाला सरासरी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ३० ते ४० रुपये रुपये प्रतिकिलो होता. डाळिंबांची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याच्या डाळिंब खरेदीदार सांगत आहेत. एकट्या नगर बाजार समितीत आतापर्यंत सुमारे ४५ हजार क्विंटल डाळिंबाची आवक झालेली पंचवीस कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.

नगर- जिल्ह्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. बारामाही उत्पादनाचे फळपीक असले तरी नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी आंबिया बहार धरतात. त्यामुळे साधारण एप्रिलपासून डाळिंबाचे उत्पादन निघण्यास सुरवात होते. सप्टेंबर अखेरपर्यंत आवक सुरू राहते. नगर जिल्ह्यामध्ये राहाता, राहुरी, नगर, कोपरगाव, संगमनेर बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव होतात. नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही येथे बऱ्यापैकी आवक होत असते. गेल्या पाच महिन्यांचा विचार करता एकट्या नगर बाजार समितीत सुमारे पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेची डाळिंबातून उलाढाल झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून परराज्यांतून मागणी वाढत असल्याने डाळिंबांच्या भावात वाढ होत आहे. आवक घटल्याचाही दर वाढीला फायदा होत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, कोलकता, राजस्थान, दिल्ली, जम्मू आदी राज्यांत नगर जिल्ह्यातून डाळिंब जातात. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण साधारण प्रतिवीस किलोचे सहा ते सात हजार क्रेट म्हणजे शंभर ते सव्वाशे क्विंटल डाळिंबाची आवक होत होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलोला दहा रुपये ते तीस रुपये सरासरी दर मिळत होता. सोमवारी मात्र प्रतिकिलोला पन्नास ते साठ रुपये दर मिळाला असून जवळपास चाळीस ते पन्नास क्विंटलने आवक घटली आहे.

उत्पादनात घट
नगर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिनाभरापासून डाळिंबावर तेल्यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, काही प्रमाणात त्याचा दरावरही परिणाम झाला आहे. मात्र आता दरात वाढ झाली असली तरी रोगाच्या प्रादुर्भावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

‘नेप्ती उपबाजार समितीत डाळिंबांची आवक कमी झाली असून, भावात सुमारे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात डाळिंबाचे भाव किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले आहेत. अलीकडच्या काळातील हे चांगले दर आहेत.’
अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...