आटपाडीत डाळिंब हंगामाला प्रारंभ; परदेशी व्यापाऱ्यांची बागांना भेट

आटपाडीत डाळिंब हंगामाला प्रारंभ; परदेशी व्यापाऱ्यांची बागांना भेट
आटपाडीत डाळिंब हंगामाला प्रारंभ; परदेशी व्यापाऱ्यांची बागांना भेट

आटपाडी, जि. सांगली ः आटपाडी तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. तालुक्‍याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. हे हवामान डाळिंब पिकासाठी पोषक मानले जाते. आता डाळिंब हंगामाची जोमात सुरवात झाली आहे. रोज शेकडो बागांचे व्यवहार होत असून फळांची तोडणी सुरू आहे. आता डाळिंबांचा हंगाम सुरू झाला असून, परदेशी व्यापारीही बागांना भेट देत आहेत.  आटपाडी तालुक्‍यात डाळिंबांचे १२ ते १५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यंदा बहार धरल्यानंतर शेतकऱ्यांना रिमझिम आणि सततच्या पावसाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे फूलगळ झाली. अनेक बागा वाया गेल्या. त्यातच अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले. परिणामी सेटिंग झालेल्या बागांमध्ये फळकुज झाली. यातून बाहेर पडलेल्या डाळिंबांची विक्रीची गेल्या महिन्यापासून सुरू झाली आहे. सध्या हंगाम तेजीत आहे. गेल्या महिन्यात सरासरी चाळीस रुपयांवर डाळिंबाचे दर आले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून डाळिंबांच्या दरात वाढ होऊ लागली आहे.  सरसकट १०० ग्रॅमवर आणि तीन बोटे चट्टा सोडून ६५ ते ७० रुपये भावाने व्यवहार सुरू आहे. डाळिंब खरेदीसाठी झारखंड आणि कोलकत्त्यातील अनेक व्यापाऱ्यांनी तळ ठोकला आहे. तसेच, युरोपसाठी एक्‍स्पोर्ट करणाऱ्या डाळिंबांचे व्यापारीही गावागावांत फिरू लागले आहेत. युरोप एक्‍स्पोर्टसाठी १२० रुपये प्रतिकिलो दर काढला आहे. अगोदर प्रयोगशाळेत तपासणी करून व्यवहार केले जातात. युरोपसाठी एक्‍सपोर्ट केलेल्या डाळिंबांचे बहुतांश सारेच व्यवहार उधारीवर सुरू आहेत, तर स्थानिकसाठी केलेले व्यवहार रोखीने सुरू आहेत. डाळिंबांच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.  भगवा डाळिंबांसाठी व्यापाऱ्यांचा ६५ ते ७० रुपये दर सुरू आहे; तर युरोप एक्‍स्पोर्टचा १२० रुपये दर सुरू आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी डाळिंब उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे व्यापारी प्रत्येक गावात फिरू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com