agriculture news in marathi Pomegranate in the state is Rs.500 to Rs.12,000 rupees | Agrowon

राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

कोल्हापूर : येथील बाजार समितीत सांगली, सोलापूर येथून डाळिंबाची दररोज ९० ते ९५ कॅरेट आवक होत आह. डाळिंबास किलोस ३० ते १२० रुपये दर मिळत आहे. 

कोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये

कोल्हापूर : येथील बाजार समितीत सांगली, सोलापूर येथून डाळिंबाची दररोज ९० ते ९५ कॅरेट आवक होत आह. डाळिंबास किलोस ३० ते १२० रुपये दर मिळत आहे. 

गेल्या पंधरवड्यापासून डाळिंबाच्या आवकेत घट असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने ग्राहकांची मागणी कमी असली, तरी डाळिंबाची आवकही फारशी नसल्याने डाळिंबाचे दर स्थिर असल्याची माहिती फळ विभागातून देण्यात आली. 

बाजार समितीत सांगली व सोलापूर, सांगोला भागातून डाळिंबाची आवक होते. लॉकडाऊनचा परिणाम डाळिंबाच्या आवकेवर दिसून येत आहे. यामुळे डाळिंबाची आवक मुबलक प्रमाणात होत नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये सरासरी २००० रुपयांचा दर

औरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी डाळिंबाची १७ क्विंटल आवक झाली. त्यांना ५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १५ एप्रिल रोजी डाळिंबाची २० क्विंटल आवक झाली. त्यांना ४०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. तर सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. त्यानंतर तीन दिवस आवक बंद होती. तर १९ एप्रिल रोजी १३ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे दर ६०० ते २५०० रुपये, तर सरासरी दर १५५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

२० एप्रिल रोजी ३४ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे सरासरी दर ६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान होते. तर सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये क्विंटलला ४०० ते ८००० रुपये दर

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२१) डाळिंबाची आवक ४३४ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल ४०० ते ८००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते. आवक सर्वसाधारण आल्याने दर स्थिर आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सप्ताहात बाजार आवारात होणारी डाळिंबाची आवक घटली आहे. मागणी व आवकेच्या तुलनेत दरातही घसरण दिसून आली. गत सप्ताहात आवक कमी, जास्त असल्याने मागणीनुसार दरात चढ उतार आहे. मंगळवारी (ता.२०) डाळिंबाची आवक २३४ क्विंटल झाली. त्यास ३०० ते ७००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये होता. 

सोमवारी (ता.१९) डाळिंबाची आवक ४६२ क्विंटल झाली. त्यास ४०० ते ९००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० होता. रविवारी (ता.१८) फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.१७) डाळिंबाची आवक २३४ क्विंटल झाली. त्यास ४५० ते ८००० असा दर मिळाला. 

सर्वसाधारण दर ५५०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१६) डाळिंबाची आवक ३१५ क्विंटल झाली. त्यास ४५० ते ११००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७५० होता. गुरुवारी (ता.१५) डाळिंबाची २७७ आवक क्विंटल झाली. त्यास ४५० ते ११००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७५० रुपये होता.

साताऱ्यात प्रतिक्विंटलला ३००० ते ६००० रुपये दर

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २२) डाळिंबाची ४० क्रेटची आवक होत आहे. डाळिंबाची बहुतांशी आवक फलटण तालुक्यातून होत आहे. डाळिंबास प्रतिक्रेटला (प्रति क्रेट १८ किलो) ५०० ते एक हजार रुपये दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 

डाळिंबाचे दर स्थिर असून दैनंदिन ३० ते ४० क्रेटची आवक होत आहे. लॅाकडाऊनचा आवक तसेच दरावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, दर स्थिर आहेत.

परभणीत क्विंटलला २००० ते ७००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१६) डाळिंबाची ३ क्विंटल आवक झाली होती. त्यावेळी प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ७००० रुपये, तर सरासरी ४५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार फळे, भाजीपाला मार्केटमधील व्यवहार तसेच शहरातील इतर ठिकाणची फळे, भाजीपाला विक्री शनिवार (ता. १७) पासून बंद आहे. गेल्या आठवड्यात पंढरपूर तसेच स्थानिक परिसरातून डाळिंबाची आवक सुरु होती. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ७००० रुपये होते, असे व्यापारी मो.फारुख यांनी सांगितले.

पुण्यात क्विंटलला २००० ते ८००० रुपये दर

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२२) डाळिंबाची सुमारे ३० टन आवक झाली होती. दर भगवा वाणाला २००० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.

‘‘सध्याच्या कोरोना टाळेबंदीमुळे राज्यातील विविध बाजार समित्या कमी प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे आवकेत घट झाली आहे. मागणी नसल्याने देखील माल शिल्लक रहात आहे, असे व्यापारी कमी प्रमाणात माल मागवित आहेत’’, अशी माहिती डाळिंबाचे प्रमुख आडतदार सिद्धार्थ खैरे यांनी दिली. 

सांगलीत प्रतिक्विंटलला ३००० ते ११००० रुपये

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे. बुधवारी (ता. २१) डाळिंबाची ३६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ११०००, तर सरासरी ७००० रुपये असा दर मिळाला.

बाजार समितीत डाळिंबाची कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून आवक होते. सोमवारी (ता. १९) डाळिंबाची २७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबास प्रतिक्विंटल ५००० ते १००००, तर सरासरी ७५०० रुपये असा दर मिळाला.

शनिवारी (ता. ३३) डाळिंबाची ३३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ४९०० ते ९०००, तर सरासरी ६५०० रुपये असा दर होता. गुरुवारी (ता. १५) डाळिंबाची २८ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबास प्रतिक्विंटल ३००० ते ८०००, तर सरासरी ५५०० रुपये असा दर होता.

सोलापुरात डाळिंबाला प्रतिक्विंटलला ९०० ते १० हजार रुपये दर

सोलापुरात ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक कमी झाली. पण मागणी असल्याने डाळिंबाचे दर तेजीत राहिले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी ३५०० रुपये, तर सर्वाधिक १० हजार रुपये असा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

गेल्या काही महिन्यांपासून डाळिंबाचे दर तेजीत आहेत. मूळात मागणी वाढलेली असताना डाळिंबाची आवक मात्र त्या पटीत नाही. डाळिंबाची आवक रोज अर्धा ते एक टन इतकी होते आहे. पण मागणी त्याच्या दुप्पट आहे, अशी परिस्थिती आहे. 

डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, मोहोळ या स्थानिक भागातून झाली. या सप्ताहात पुन्हा कमी आवक आणि दराची तेजीची स्थिती कायम राहिली.  या आधीच्या सप्ताहातही डाळिंबाची आवक प्रतिदिन एक ते दीड टन अगदीच जेमतेम राहिली. तर दर किमान ८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक १० हजार ५०० रुपये दर मिळाला. 

डाळिंबाचे दर तेजीत

पंधरवड्यापूर्वीही आवक काहीशी एक-दोन टन अशीच होती. तर दर किमान १००० रुपये, सरासरी ३२०० रुपये, तर सर्वाधिक ११००० रुपये असा होता. गेल्या काही दिवसांत ५०० ते १००० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर तेजीत राहिल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...