डाळिंब व्यापाऱ्याला सांगोल्यात २१ लाखांचा गंडा

pomegranate
pomegranate

सांगोला, जि. सोलापूर : शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या सुमारे २३ टन ८२८ किलो इतक्‍या डाळिंबाने भरलेला एका व्यापाऱ्याचा मालट्रक चालकाने संबंधित ठिकाणी न पोचविता परस्पर लंपास केला. या डाळिंबाची साधारण किंमत २१ लाख ५०० रुपये तसेच चालकास डिझेलसाठी दिलेले ८३ हजार २८६ असे एकूण २१ लाख ८३ हजार ७८६ रुपये घेऊन चालकाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  याप्रकरणी ट्रकचालक धर्मेंद्र जैयस्वार (रा. बहेरी रोड, बरेली, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध व्यापारी शशिकांत विठ्ठल येलपले (रा. यमगर मंगेवाडी, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. श्री. येलपले अनेक वर्षांपासून सांगोल्यात शेतकऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. २५ डिसेंबरला शशिकांत येलपले यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या ज्ञानराज कृषी ट्रान्सपोर्टमधून (डब्लूबी ११ डी ९३७३) क्रमांकाच्या ट्रकमधून २१ लाख ५०० रुपयांचे २३ हजार ८२८ किलो डाळिंब १०३६ क्रेटमधून महम्मद कलिमउद्दीन (रा. पश्‍चिम बंगाल) यांच्याकडे घेऊन जाण्यास चालक धर्मेंद्र जैयस्वार (रा. बहेरी रोड, बरेली, उत्तर प्रदेश) यास पाठवले होते.  डाळिंबाचा ट्रक घेऊन जाताना धर्मेंद्र जैयस्वार यास डिझेलसाठी ८३ हजार २८६ रुपयेही दिले होते. पैसे देताना अन्य शेतकरी रामचंद्र गुरव व समाधान डुकरे हजर होते. या वेळी ट्रकचालकाने मेहंदीपूर मालदा (पश्‍चिम बंगाल) येथे डाळिंब घेऊन जातो, असे सांगितले. त्यानंतर पश्‍चिम बंगालमधील व्यापारी महम्मद कलिमउद्दीन यांनी येलपले यांना फोनद्वारे तुम्ही पाठवलेला माल मिळाला नसल्याचे सांगितले.  ट्रकचालक धर्मेंद्र जैयस्वार याच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होत नव्हता. संबंधित ठिकाणी डाळिंब पोच झाली नसल्याने ट्रकचालकाने फसवणूक करून सदरचा माल परस्पर विकल्याची खात्री येलपले यांना झाली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेत गुन्हा दाखल केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com