agriculture news in Marathi pomegranate traders will reach to farmers Maharashtra | Agrowon

डाळींब व्यापाऱ्यांना पाठविणार थेट बांधावर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

संचारबंदीमुळे डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक व्यापारी नसल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी बाजार समिती थेट शेतात व्यापारी पाठवणार आहे.

आटपाडी, जि. सांगलीः संचारबंदीमुळे डाळिंब आणि भाजीपाला उत्पादक व्यापारी नसल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी बाजार समिती थेट शेतात व्यापारी पाठवणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या भाजीपाल्याची नोंद बाजार समितीकडे करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. यावेळी सभापती भाऊसाहेब गायकवाड, बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ नागणे, सचिव शशिकांत जाधव यांच्यासह प्रमुख व्यापारी उपस्थित होते. 

बैठकीत तालुक्‍यात सध्या उपलब्ध असलेल्या डाळिंब आणि भाजीपाला उत्पादनावर चर्चा झाली. तसेच ज्यांचे डाळिंब विक्रीसाठी आले आहेत असे शेतकरी आणि टोमॅटो, शेवगा, ढोबळी मिरची आणि कलिंगड याची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी थेट संपर्क करून लागवडीचे आणि अंदाजे उत्पादन किती निघेल याची नोंद करण्याचा निर्णय घेतला. या नोंदीच्या आधारे या शेतकऱ्यांच्या बांधावर थेट व्यापाऱ्यांना पाठवण्याचे नियोजन बाजार समितीने केले आहे. 

शेतकऱ्यांचा भाजीपाला सडून वाया जाऊ नये यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी बाजार समितीने निर्णय घेतला आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी डाळिंब, टोमॅटो, शेवगा आणि ढोबळी मिरची याची नोंद करावी, असे आवाहन केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...