आठ एकरांवरील डाळिंब बाग जळाली

डाळींब बाग
डाळींब बाग

नाशिक : सटाणा पालिकेच्या चौगाव रस्त्यावरील कचरा डेपोलगत असलेल्या आठ एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या बागेसह उंच वाढलेले वृक्ष व दोन एकरांतील कांदा जळून खाक झाल्याची घटना घडली. कचरा डेपोमुळे आग अधिक वाढल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शहराजवळ चौगाव रस्त्यावर पालिकेचा कचरा डेपो आहे. या डेपोला लागून असलेल्या माजी नगराध्यक्ष श्री. सोनवणे यांच्या शेतातील डाळिंब बागेत शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. विजेच्या तारांचे घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्या डाळिंब बागेवर पडल्या. त्यातच कचरा डेपोतील कचरा बागेत हवेने उडून येत असल्याने तीव्र तापमानामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले. यामुळे डाळिंब बागेसह दोन एकरांतील कांदा डोंगळे बियाणेदेखील कवेत घेतले. आगीचे लोळ व धूर शेतात पसरला होता.  परिसरातील शेतकऱ्यांसह सोनवणे कुटुंबीयांनी उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तात्काळ पालिकेच्या अग्निशामक दलास देण्यात आली. मात्र पाणी उपलब्ध नसल्याने या बंबाचा उपयोग नसल्याचे लक्षात येताच माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे यांनी आपल्या खासगी पाण्याचे टँकर त्वरित उपलब्ध करून देत आग विझविण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न व्यर्थ ठरले आणि आठ एकरावरील बाग तसेच दोन एकरांतील कांदा बियाणे आगीत भस्मसात झाले. ठिबक सिंचनाच्या नळ्यादेखील जळल्या. मोठ्या कष्टाने उभी केलेली डाळिंबाची बाग काही क्षणांत जळून खाक झाल्याने सोनवणे कुटुंबीयाचे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com