Agriculture news in marathi, Pomegranate uplift in Solapur; Rate improvement | Agrowon

सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर चांगलेच वधारले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर चांगलेच वधारले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १७ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात डाळिंबांची आवक रोज साधारण अर्धा ते एक टनापर्यंत राहिली. वास्तविक, मागणीच्या प्रमाणात ही आवक नसल्याने डाळिंबाला चांगला उठाव मिळतो आहे. त्यातच सध्या विविध रोगाच्या प्रादुर्भावाने डाळिंबात समस्या वाढली आहे. साहजिकच सरासरी उत्पादन कमी निघते आहे. तसेच गुणवत्ताही मिळत नाही. मागणी आणि आवक यात तीव्र तुटवडा जाणवत असल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरातील तेजी वाढली आहे. या सप्ताहात पुन्हा आणखी तेजी राहिली. 

डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या स्थानिक भागातून झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान एक हजार रुपये, सरासरी साडेतीन हजार रुपये आणि सर्वाधिक १७ हजार रुपये असा दर मिळाला. संपूर्ण सप्ताहभर ४०० ते ५०० रुपयांच्या फरकाचा चढ-उतार वगळता दर तेजीत राहिले. त्याशिवाय कांद्याचे दरही काहीसे स्थिर राहिले. कांद्याची आवक मात्र रोज ४० ते ५० गाड्यांपर्यंत कायम राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी एक हजार रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला. 

वांगी, गवार, भेंडीच्या दरात या सप्ताहात बऱ्यापैकी वाढ झाली. त्यांची आवकही प्रत्येकी ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये, गवारीला किमान दोन हजार रुपये, सरासरी तीन हजार रुपये आणि सर्वाधिक चार हजार रुपये, तर भेंडीला किमान ५०० रुपये, सरासरी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक तीन हजार रुपये असा दर मिळाला.

कोथिंबीर, मेथीही तेजीत

भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मेथीच्या दरातही वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक कमीच आहे. प्रतिदिन ८ ते १० हजार पेंढ्यांपर्यंतच आवक आहे. पण मागणी अधिक असल्यानं दर तेजीत राहिले. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी एक हजार ते १५०० रुपये, मेथीला ८०० ते १३०० रुपये, शेपूला ५०० ते ८०० रुपये आणि चुका, पालकाला प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...