डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार  : सहकारमंत्री
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार : सहकारमंत्री

डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार : सहकारमंत्री

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब गुणवत्तापूर्ण आहे. पण, त्याचे मार्केटिंग वाढणे आवश्यक आहे. शिवाय त्याच्या प्रकिया उद्योगाबाबतही प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू’’, असे आश्वासन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगोला येथे दिले.

सोलापूर सोशल फाउंडेशन, ग्रीन होराईजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, पणन व कृषी विभागातर्फे सांगोला येथे आयोजित  डाळिंब, मार्केटिंग, प्रक्रिया उत्पादन कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी राष्ट्रीय डाळिंब केंद्राच्या संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा, कृषिभूषण अंकुश पडवळे, अपेडाचे सहायक सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक प्रशांत सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उद्योजक अभिजीत पाटील, पूर्वा वाघमारे, रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, हरिदास थोरात, राजेंद्र जठार, राजकुमार हिवरकर, आनंद माळी उपस्थित होते.

देशमूख म्हणाले, ‘‘सोलापूरमध्ये उत्पादन होणाऱ्या विविध शेती उत्पादनांना स्थानिक व परदेशातील मार्केट मिळवणे व डाळिंबाचे मूल्यवर्धन वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभा करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा विचार करावा. या माध्यमातून डाळिंबाचे चांगले मार्केटिंग होऊ शकते. डाळिंबाला मिळालेले जीआय मानांकन सोलापूरसाठी मोठी संधी आहे. यासाठी डाळिंबाचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग व प्रमोशनसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अपेडाची मदत घेण्यात येईल.’’ 

कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी डाळिंब उत्पादकांच्या समस्या मांडल्या. त्या वेळी शर्मा, बिराजदार, पाटील, राज्य डाळिंब संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख आदींची भाषणे झाली.

वाघमारे यांनी ‘जागतिक बाजार पेठेत भारतीय डाळिंबाचे स्थान’, राष्टीय डाळिंब केंद्राचे शात्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी ‘डाळिंब प्रक्रिया भविष्यातील संधी’ आणि कंपनीचे संचालक अमरजित जगताप यांनी ‘निर्यात डाळिंब उत्पादनाचे तांत्रिक नियोजन’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत दत्तु व हरिभाऊ यादव यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार हिवरकर यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com