Agriculture news in marathi, Pomegranate will help marketing, processing industry: Co-operation Minister | Agrowon

डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार : सहकारमंत्री

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब गुणवत्तापूर्ण आहे. पण, त्याचे मार्केटिंग वाढणे आवश्यक आहे. शिवाय त्याच्या प्रकिया उद्योगाबाबतही प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू’’, असे आश्वासन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगोला येथे दिले.

सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब गुणवत्तापूर्ण आहे. पण, त्याचे मार्केटिंग वाढणे आवश्यक आहे. शिवाय त्याच्या प्रकिया उद्योगाबाबतही प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू’’, असे आश्वासन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगोला येथे दिले.

सोलापूर सोशल फाउंडेशन, ग्रीन होराईजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, पणन व कृषी विभागातर्फे सांगोला येथे आयोजित  डाळिंब, मार्केटिंग, प्रक्रिया उत्पादन कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी राष्ट्रीय डाळिंब केंद्राच्या संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा, कृषिभूषण अंकुश पडवळे, अपेडाचे सहायक सरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक प्रशांत सुर्यवंशी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उद्योजक अभिजीत पाटील, पूर्वा वाघमारे, रवींद्र कांबळे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, हरिदास थोरात, राजेंद्र जठार, राजकुमार हिवरकर, आनंद माळी उपस्थित होते.

देशमूख म्हणाले, ‘‘सोलापूरमध्ये उत्पादन होणाऱ्या विविध शेती उत्पादनांना स्थानिक व परदेशातील मार्केट मिळवणे व डाळिंबाचे मूल्यवर्धन वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभा करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा विचार करावा. या माध्यमातून डाळिंबाचे चांगले मार्केटिंग होऊ शकते. डाळिंबाला मिळालेले जीआय मानांकन सोलापूरसाठी मोठी संधी आहे. यासाठी डाळिंबाचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग व प्रमोशनसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अपेडाची मदत घेण्यात येईल.’’ 

कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी डाळिंब उत्पादकांच्या समस्या मांडल्या. त्या वेळी शर्मा, बिराजदार, पाटील, राज्य डाळिंब संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख आदींची भाषणे झाली.

वाघमारे यांनी ‘जागतिक बाजार पेठेत भारतीय डाळिंबाचे स्थान’, राष्टीय डाळिंब केंद्राचे शात्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड यांनी ‘डाळिंब प्रक्रिया भविष्यातील संधी’ आणि कंपनीचे संचालक अमरजित जगताप यांनी ‘निर्यात डाळिंब उत्पादनाचे तांत्रिक नियोजन’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भारत दत्तु व हरिभाऊ यादव यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार हिवरकर यांनी आभार मानले.


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...