agriculture news in marathi, ponds become dry, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ७ तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018
परभणी : वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या तलावांतील उपयुक्त पाणीसाठ्यात घट सुरूच आहे. आठवडाभरात भोसी (ता. जिंतूर) येथील लघू तलाव कोरडा पडल्यामुळे कोरड्या पडलेल्या तलावांची संख्या सात झाली आहे. २२ पैकी केवळ ५ तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. पाणीटंचाईचे संकट दिवसगणिक गडद होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २७ पर्यंत पोचली आहे.
 
परभणी : वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या तलावांतील उपयुक्त पाणीसाठ्यात घट सुरूच आहे. आठवडाभरात भोसी (ता. जिंतूर) येथील लघू तलाव कोरडा पडल्यामुळे कोरड्या पडलेल्या तलावांची संख्या सात झाली आहे. २२ पैकी केवळ ५ तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. पाणीटंचाईचे संकट दिवसगणिक गडद होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २७ पर्यंत पोचली आहे.
 
रविवारी (ता. १३) पैठण येथील जायकवाडी धरणात ३४.४५, माजलगाव प्रकल्पात १८.२१, निम्न दुधना प्रकल्पात २७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. आठवडाभरामध्ये या तीन धरणातील पाणीसाठ्यात अनुक्रमे ३.२८, ०.७ आणि ८.६६ टक्के घट झाली आहे. निम्न दुधना धरणातून परभणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे.
 
येलदरी आणि सिध्देश्वर या दोनही धरणांतील मृत पाणीसाठ्यात घट होत आहे. करपरा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठवडाभरात २ टक्के घट झाली असून, रविवारी या धरणात १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. २२ लघू तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव, भोसी हे सात तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगाव, कोद्री, देवगाव, वडाळी, चारठाणा, केहाळ या आठ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
 
उर्वरित तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावात आता ९३ टक्के  पाणीसाठा आहे. पेडगाव आणि आंबेगाव तलावामध्ये केवळ १, पिंपळदरीमध्ये ५.६, कवडा तलावामध्ये ९, मांडवी तलावामध्ये २, पाडाळी तलावामध्ये ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.
 
भूजलपातळी गतवर्षीपेक्षा खोल गेली आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी, बोअरची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात २६ टॅंकर सुरू होते. त्यामध्ये एकाची भर पडल्यामुळे टॅंकरची संख्या २७ झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...