agriculture news in marathi, ponds become dry, parbhani, maharashtra | Agrowon

परभणीतील ९ तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

परभणी:  पाणीसाठा संपल्याने कोरडे पडलेल्या जिल्ह्यातील तलावांची संख्या या आठवड्यामध्ये ९ झाली आहे. येलदरी, सिध्देश्वर धरणातील मृत पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे. २२ पैकी ५ तलावांमध्ये केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असताना जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. जिल्ह्यात टॅंकरची संख्या ३५ पर्यंत वाढली आहे.

परभणी:  पाणीसाठा संपल्याने कोरडे पडलेल्या जिल्ह्यातील तलावांची संख्या या आठवड्यामध्ये ९ झाली आहे. येलदरी, सिध्देश्वर धरणातील मृत पाणीसाठ्यामध्ये घट होत आहे. २२ पैकी ५ तलावांमध्ये केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असताना जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट अधिक गहिरे होत आहे. जिल्ह्यात टॅंकरची संख्या ३५ पर्यंत वाढली आहे.

रविवारी (ता. २७) सकाळी पैठण येथील जायकवाडी धरणात २७.९६, माजलगाव प्रकल्पात १०, निम्न दुधना प्रकल्पात १७.७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. पंधरवाड्यामध्ये या तीन मोठ्या धरणातील पाणीसाठ्यात अनुक्रमे ६.४९, ८.२१ आणि १०.३७ टक्क्यांनी घट झाली आहे.

येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन ही धरणांतील मृत पाणीसाठ्यात घट होत आहे. करपरा मध्यम प्रकल्पात १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून त्यात पंधरा दिवसांंत ४ टक्क्यांनी घट झाली. २२ पैकी टाकळवाडी, देवगांव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, आडगांव, दहेगांव हे नऊ तलाव कोरडे पडले आहेत.

पेडगाव, आंबेगाव, नखातवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगांव, कोद्री, केहाळ, भोसी या तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला असून तो जोत्याखाली गेला आहे. यापैकी अनेक तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.

झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावात आता ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पिंपळदरीत ४, कवडा तलावात ७, मांडवीत १, पाडाळीत २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

प्रकल्प कोरडे पडत चालल्यामुळे भूजल पातळी खालावत आहे. त्यामुळे आटत चाललेल्या विहिरी, बोअरची संख्या वाढत आहे. गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पंधरवाड्यामध्ये ८ टॅंकरची भर पडल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या ३५ पर्यंत वाढली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...