सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप द्यावे : पोपटराव पवार

पुढील दशकात शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या सुपीकता हीच राहील. आपण सध्या केवळ ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असे म्हणतो आहोत; पण मातीकडे दुर्लक्ष होत आहे. अॅग्रोवनकडून ‘जमीन सुपीकता वर्ष २०१८’ जाहीर होणे ही कौतुकाची बाब आहे. एका दुर्लक्षित विषयाकडे अॅग्रोवनने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप द्यावे : पोपटराव पवार
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप द्यावे : पोपटराव पवार

राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा मुद्दा जमिनीच्या सुपीकतेवरच अवलंबून आहे. जमीन सुपीकतेचा खरा गाभा असलेल्या सेंद्रिय कर्बवाढीच्या मुद्द्यांना धोरणात्मक रूप देण्याची गरज आहे, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे. पाण्याप्रमाणेच सेंद्रिय कर्ब हा विषय महाराष्ट्राच्या शेतीविषयक विकासातील धोरणाचा मुख्य भाग झाला पाहिजे. सेंद्रिय कर्बच आपली शेती जीवंत ठेवतो. मात्र, खते आणि कीटकनाशकांचा भडिमार करून आपण कर्ब घटविला आहे. त्यामुळे पिकांना उपयुक्त जिवाणुंची संख्यादेखील घटली आहे. प्रत्येक गावाचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी दीर्घकालीन कामाचे आराखडे तयार करावेत. जमिनीची सुपीकता वाढविणे हेच आता कृषी विद्यापीठे व कृषी विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. माझ्या मते राज्याच्या शेतजमिनीला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सरग्रस्त शेतजमिनीला आता तत्काळ उपचाराची आणि विश्रांतीची आवश्यकता आहे. तसे न केल्यास भविष्यात शेती उजाड होईल आणि राज्याच्या अनेक भागात स्थलांतर आणि अन्नधान्याचे अपूर्ण उत्पादन अशा समस्या उद्भवतील. आमच्या मते आधीचा शेतकरी सुक्षिशित नसला तरी जमिनीची काळजी घेणारा होता. वाडवडिलांकडून चालत आलेल्या प्रथापरंपरेनुसार शेतजमिनीची काळजी घेण्याची पद्धत आधी होती. शेणखतांचा भरपूर वापर, पिकांची फेरपालट तसेच सेंद्रिय काडीकचरा शेतीत कुजविण्याची पद्धत होती. त्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहिला. आधुनिक शेतीमध्ये उत्पादन वाढले पण जमिनीचे आरोग्य आपण बिघडवले आहे. जमीन सुपिकतेसाठी शेतकऱ्याला पुरेसे मार्गदर्शन होत नाही. जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर करून शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दोष देता येणार नाही. कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेत जमीन सुपीक ठेवत चांगले उत्पन्न देणारे तंत्र सतत उपलब्ध राहील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. - पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com