बैलबंडीवर बसून पोपटराव पवार यांनी केली घाटकूळची पाहणी

बैलबंडीवर बसून पोपटराव पवार यांनी केली घाटकूळची पाहणी
बैलबंडीवर बसून पोपटराव पवार यांनी केली घाटकूळची पाहणी

गोंडपिंपरी, जि.चंद्रपूर ः पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याकरिता गावाच्या शिवेवरून बैलबंडीत बसण्याचा नागरिकांनी आग्रह धरला. ते बसलेही पण बैलबंडी चालविण्याचा मोह त्यांना आवरला नाही. हातात कासरा, तुतारी अन् ढवळ्या पवळ्याच्या जोडीला समोर हाकत पोपटराव निघाले. गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या बैलबंडी प्रवासाने नागरिकही भारावले. पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ गावात हा प्रसंग घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १ हजार गाव आदर्श करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. या अभियानातून घाटकुळ येथे प्रभावी उपक्रम राबविले जात आहेत. गावातील शाळा, अंगणवाडी आयएसओ नामांकित आहे. एवढेच नव्हे तर आयएसओ नामांकित झालेली राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबविण्यात आली आहे. पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी संचालक ज्ञानेश्वर बोटे, प्रफुल तांबे, प्रफुल रंगारी, ख्याती मेनझेस, अक्षय प्रकाश यांचा समावेश असलेली चमू राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यासाठी घाटकुळात आली. या चमूने संपूर्ण गावाची पाहणी केली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गावाचे निर्णय आपणच घ्यावे, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, तहसीलदार बिराजदार, बीडीओ धनंजय साळवे, उपसभापती विनोद देशमुख, सरपंच प्रीती मेदाळे, ग्रामप्रवर्तक अविनाश पोईनकर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com