पॉप्युलर स्टिलचे दिलीप जाधव यांचे निधन 

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक व शेतीअवजारे उत्पादनातील अग्रगण्य कंपनी ‘पॉप्युलर स्टील वर्क्स’चे मालक दिलीप केशवराव जाधव (वय ६७) यांचे गुरुवारी (ता. २८) निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात भाऊ उद्योजक राजेंद्र जाधव, पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Popular Steel's Dilip Jadhav passes away

यांत्रिकीकरणातील बदलांचा वेध घेऊन त्यांनी शेतीमध्ये उपयोगी पडणारी अवजारे बनण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी आपल्या कारखान्यात स्वतंत्र रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभाग सुरू केला. विविध अवजारांचे आराखडे तयार केले. दोन व तीन फाळी पलटी नांगर, हायड्रोलिक ऑपरेटेड पल्टी नांगर, स्वयंचलीत पेरणी यंत्र, ऊस भरणी अवजार, रोटर, ओढता डिस्क हॅरो, गादी वाफा यंत्र, बैली नांगर, सायकल कोळपा इत्यादी प्रकारची सुमारे १०० विविध प्रकारची उत्पादने त्यांनी बनवली. 

दूरदृष्टी आणि मेहनतीवर त्यांनी पॉप्युलर हा ब्रॅंड विकसीत केला. मॅक्सिको देशाने त्यांना ‘इंटरनॅशनल डायमंड स्टार फॉर क्वालिटी ऑर्डर’ या पुरस्काराने सन्मनित केले. या शिवाय महाराष्ट्र शासनाने त्यांनी गुणी उद्योजक पुरस्काराने सन्मानित केले. जाधव यांच्या निधनाने उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com