agriculture news in Marathi, positive condition for monsoon, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनसाठी पोषक वातावरण; विदर्भात उष्णतेची लाट कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

पुणे ः अंदमान समुद्र, निकोबार परिसर आणि बंगालचा उपसागर या परिसरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दोन ते तीन दिवसांत तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होणार असून, उष्णतेत घट होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भात अजून चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः अंदमान समुद्र, निकोबार परिसर आणि बंगालचा उपसागर या परिसरात मॉन्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दोन ते तीन दिवसांत तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काही दिवसांत वातावरणात बदल होणार असून, उष्णतेत घट होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भात अजून चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मध्य महाराष्ट्र ते कोरोरीन परिसर, कर्नाटक व परिसर तमिळनाडूच्या परिसरात समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर दक्षिण कर्नाटकाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तर अंदमान व मलाय पेनीसुलाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. विदर्भात काही भागांत हवामान कोरडे असून हवा उष्ण होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. विदर्भात सकाळपासून उन्हाच्या झळा वाढत असून, नागरिकांना त्या असह्य होत आहे. बुधवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४६.४ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागांत असलेली उष्णतेची लाट अजूनही तीन ते चार दिवस राहणार असल्याची शक्यता आहे. 

गुरुवार (ता.१६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.८ (०.३), जळगाव ४१.४ (-१.३), कोल्हापूर ३७.४ (१.२), महाबळेश्‍वर ३२.९ (२.०), मालेगाव ४२.६ (१.८), नाशिक ३६.३ (-२.०), सांगली ३९.० (१.५), सातारा ३८.६ (२.०), सोलापूर ४२.० (१.३), मुंबई (सांताक्रूझ) ३३.५ (-०.१), मुंबई ३३.५, अलिबाग ३१.७ (-१.२), रत्नागिरी ३३.६ (०.८), डहाणू ३४.८ (०.७), औरंगाबाद ४०.२ (०.४), बीड ४२.१ (१.७), परभणी ४३.८ (१.८), नांदेड ४२.० (०.१), अकोला ४३.८ (१.६), अमरावती ४३.६ (१.२).


इतर अॅग्रो विशेष
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...