कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता

हवामान
हवामान

पुणे: राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेणारा पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. आजपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर मंगळवारपासून (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढण्याची, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी सकाळपासूनच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. बांग्लादेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर सोमवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवार ते गुरुवार या काळात अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य भारतासह, पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलीमीटमध्ये - स्राेत कृषी विभाग) : कोकण : खारबाव ३५, कर्जत ३३, कडाव ३१, खोपोली ३०, माणगाव ३३, गोरेगाव ३५, लोनेरे ३०, निझामपूर ४२, पोलादपूर ५१, कोंडवी ५१, वाकण ३५, रामपूर ४०, वाहल ३०, असुर्डे ६५, कळकवणे ३८, शिरगांव ६८, कुलवंडी ३५, तलवली ४२, पटपन्हाले ३२, अबलोली ४०, मंडणगड ५३, म्हाप्रल ५८, देव्हरे ४७, कडवी ४४, मुरडव ३५, माखजन ४५, फुंगुस ५२, फनसावणे ४७, अंगवली ३०, कोडगाव ६६, देवली ४०, देवरुख ४६, तुलसानी ३८, माभले ४७, तेरहे ४२, सवंडल ५२, लांजा ४४, भांबेड ४५, विलवडे ३६, अंबोली ७०, कसा ६७, जव्हार ४७, साखर ५४, मोखडा ४२, खोडला ५२, तलवड ६०. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३६, धारगाव ३६, वेळुंजे ३२, हर्सूल ३१, शेंडी ३२, मुठे ३१, केळघर ३४, हेळवाक ९१, महाबळेश्‍वर ९५, तापोळा ६५, लामज ७२, कोकरुड ४२, शिराळा ३०, चरण ३०, करंजफेन ३८, मलकापूर ४६, आंबा ४६, साळवण ३२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com