agriculture news in marathi, possibilities of increased in temperature due rain stopped, Maharashtra | Agrowon

पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढीची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

पुणे: राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता अाहे. मंगळवारपर्यंत (ता. ४) बऱ्याच ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे: राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता अाहे. मंगळवारपर्यंत (ता. ४) बऱ्याच ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

विषुववृत्ताकडून येणारा मॉन्सूनचा प्रवाह मंदावला आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर माॅन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पूर्व भाग सक्रिय असल्याने उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागात पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, हरियाना आदी राज्यांमध्ये मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.  

 मंगळवारपर्यंत कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची दडी कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोकणात अनेक ठिकाणी मध्य स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. नगर येथे सर्वाधिक ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे. विदर्भात तापमानाचा पारा २८ ते ३२ अंश, मराठवाड्यात २९ अंश, कोकणात २९ ते ३१ अंश, तर मध्य महाराष्ट्रात २७ ते ३३ अंशांच्या आसपास आहे.  

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - कृषी विभाग) : कोकण : चिपळूण ३०, खेर्डी २८, शिरगाव २५, अंबवली २९, गुहाघर २९, फणसोप २०, पाली २३, फुणगुस २३, अंगवली ३६, देवळे २१, देवरुख २७, तुलसानी ७१, माभले २२, पाचल ३२, लांजा २२, विलवडे २७, अंबोली ३३, फोंडा २१, कडवल २०, येडगाव २२, मध्य महाराष्ट्र : रावेर ३४, आंबा ३१, साळवण ३६.

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...