agriculture news in Marathi, possibilities of rain in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

पुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या संगामामुळे विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळी वारे, विजांच्या निर्मितीसाठी पोषक हवामान होत आहे. आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात उन्हाचा तापही कायम असून, मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या संगामामुळे विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळी वारे, विजांच्या निर्मितीसाठी पोषक हवामान होत आहे. आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात उन्हाचा तापही कायम असून, मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरातून होत असलेला बाष्पाच्या पुरवठ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. तसेच तापमानातही चढ-उतार होत असल्याचे दिसून आले आहे. परभणी येथे सलग दिवस देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे तापमानाचा पारा ४१.२ अंशांच्या पुढे गेला होता. तर बीड, वर्धा, अमरावतीमध्ये तापमान ४० पार गेल्याने उन्हाचा चटका वाढला होता.

या सर्वच ठिकाणच्या तापमानात अल्पशी घट झाली असून, परभणी येथे तापमान ३९.६ अंशांपर्यंत खाली आले होते. मालेगाव, सोलापूर, बीड, नांदेड येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तर राज्याच्या बहुतांशी भागात ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

मंगळवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.४ (१.०), नगर ४०.३ (४.०), धुळे ३७.०, जळगाव ३८.० (-१.०), कोल्हापूर ३६.९ (१.०), महाबळेश्वर ३२.७ (१.०), मालेगाव ३९.२ (१.०), नाशिक ३३.५(-३.०), सांगली ३७.७ (०.०), सातारा ३६.८ (१.०), सोलापूर ३९.१ (१.०), अलिबाग २९.६ (-१.०), डहाणू ३१.३ (०.०), सांताक्रूझ ३४.० (१.०), रत्नागिरी ३२.० (०.०), औरंगाबाद ३६.६ (०.०), बीड ३९.३ (३.०), नांदेड ३९.५ (२.०), परभणी ३९.६ (२.०), अकोला ३७.५ (-०.५), अमरावती ३८.८ (१.७), बुलडाणा ३४.५ (-०.३), बह्मपुरी ३७.४ (०.२), चंद्रपूर ३८.२ (०.०), गडचिरोली ३७.०, गोंदिया ३०.८ (-५.९), नागपूर ३४.३ (-२.८), वर्धा ३६.० (-०.९), वाशिम ३७.६, यवतमाळ ३८.० (१.३).

इतर अॅग्रो विशेष
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...