आंबा उत्पादनात तीस टक्के घट शक्य

हवामान बदलामुळे कोकणातील आंबा उत्पादनात सुमारे तीस टक्केपर्यंत घटण्याची शक्यता आहे. मुंबईच्या बाजारपेठेमध्ये आंध्र व कर्नाटकचा दिसायला साधर्म्य असलेला पण चवीला निकृष्ट असलेला आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेला आहे. यातच दलाल, व्यापारी भाव पाडत आहेत. परिणामी, यंदा आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा विचार होऊन कोकणातील आंबा उत्पादकाला शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी,अशी अपेक्षा आहे. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ
आंबा
आंबा

कोल्हापूर: गेल्या महिनाभरातील हवामान बदलामुळे आंब्यावर तुडतुडे कीड, भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम फळ उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के आवक घटण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने व्‍यक्त केली आहे. यावर्षी हवामान बदलाचा मोठा फटका आंब्याला बसला. दोन-तीन वेळा आलेला मोहोर, तुडतुडे, फुलकिडे आणि भुरी रोगाचा वाढलेला प्रभाव यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. आंबा मोहोर येण्याची नियमित प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबर पासून सुरू होते. यावर्षी देखील चांगली सुरवात झाली मात्र बदलत्या हवामानामुळे  पुन्हा मोहोर येण्यास सुरवात झाली. त्याचा परिणाम फळांच्या वाढीवर झाला. पहिला बहर कमकुवत झाला. तशातच फेब्रुवारीत कमी होणारी थंडी मार्चपर्यंत वाढली. प्रतिकूल हवामानामुळे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागांना तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ही स्थिती बहुतांशी करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही निर्माण झाली आहे यावर भरीस भर म्हणून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रात्री उष्णतामान वाढले. याचा विपरित परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. या सगळ्याचा परिणाम यंदा आंब्याच्या गुणवत्तेवर होईल, अशी भीती आंबा बागायतदार व्यक्त करताहेत. गेल्या वर्षी कोकणातून मुंबईला दर दिवसाला ४० ते ४५ हजार पेट्या जायच्या मात्र आज ही संख्या २० ते २२ हजार इतकी घसरली आहे. अवकाळीचा धसका राजापूर, रत्नागिरी तालुक्‍यांतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी अजूनही धुके आहे. या बदलत्या वातावरणाचा हापूसवर परिणाम होत आहे. तुडतुड्याबरोबरच बुरशीचा प्रादुर्भाव हापूसवर होऊ लागला आहे.  वाशी बाजारपेठेत नीचांकी आवक प्रतिकूल हवामानामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या अवघ्या ४३ हजार पेट्याच वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. परंपरेप्रमाणे कोकणातील बागायतदार हापूस तोडून बाजारात विक्रीसाठी या मुहूर्तावर आणतात. दरवर्षी एक लाखाहून अधिक पेट्या वाशी फळ बाजारात दाखल होतात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निम्म्याच पेट्या गेल्या. पेटीचा दर १२०० ते चार हजार रुपयांपर्यंत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com