agriculture news in Marathi, possibility of 50 sugar factories may closed, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

राज्याच्या गाळप हंगामाला लागणाऱ्या ऊसपुरवठ्यात 
कोल्हापूर, गलीचे स्थान मोलाचे असते. महापुरानंतर तेथील ऊस शेतीचे निश्चित किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज येणे महत्त्वाचे आहे. नुकसानीची अंतिम माहिती हाती आल्यावर हंगामाची गणिते निश्चित होतील. अर्थात, गाळप नियोजनाच्या दृष्टीने मंत्री समितीची बैठक घेण्याबाबत आम्ही शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त 

पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या अंदाजापेक्षाही अजून घटण्याची भीती आहे. त्यामुळे गाळप हंगामाला यंदा नोव्हेंबरपासून सुरवात होण्याची शक्यता आहे; तसेच किमान ५० कारखाने यंदा बंद राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

शेतकऱ्यांनी गेल्या हंगामात १९५ कारखान्यांना ९५२ लाख टन ऊस पुरविला होता. यातून १०२ सहकारी आणि ९३ खासगी कारखान्यांनी १०७ लाख टन साखर तयार केली. यंदाचे चित्र मात्र गुंतागुंतीचे आहे. राज्याच्या एका भागात दुष्काळ; तर दुसऱ्या बाजूला पुरामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच्या अंदाजानुसार यंदा ८४३ लाख टन ऊस मिळण्याची शक्यता होती. मात्र पूर आणि दुष्काळी स्थितीमुळे अंदाज विस्कळित झाल्याने अंतिम ऊस उपलब्धतेबाबत उत्सुकता वाढली आहे. 

“राज्यात किमान ५० कारखान्यांची धुराडी यंदा पेटणार नाहीत. उपलब्ध ऊस बघता १०० कारखान्यांमध्ये देखील गाळप पूर्ण होऊ शकते. मात्र, राजकीय पक्षांशी संबंधित कारखान्यांना मतदारसंघातील गणिते जुळवण्यासाठी रडतखडत कारखाने चालवावे लागतात. त्यामुळे आवश्यकता नसतानाही काही कारखाने सुरू केले जातात. यंदाही तसे होईल. तरीही कारखान्यांची एकूण संख्या दीडशेच्या आसपासच राहील,” अशी माहिती साखर उद्योगातून देण्यात आली. 

गेल्या हंगामात दीड लाख हेक्टरवर कोल्हापूर; तर ९० हजार हेक्टरवर सांगलीतील शेतकऱ्यांनी ऊस लावला होता. राज्याच्या यंदा फक्त कोल्हापूर, सांगली भागात किमान १२ हजार हेक्टरने क्षेत्र वाढण्याचा अंदाज होता. मात्र, महापुरामुळे वाढीपेक्षाही मोठी हानी पदरात पडल्याने गाळपाचे नियोजन बिघडणार आहे. 

यंदाच्या गाळप हंगामासाठी ऑगस्टअखेर अर्ज करण्याच्या सूचना राज्यातील साखर कारखान्यांना दिल्या गेल्या होत्या. मात्र, अजून एकही अर्ज आलेला नाही. अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्यास एक आठवड्यात ऑनलाइन परवाना मिळणार आहे. मंत्रिसमितीची बैठक व परवाना वाटप याचा संबंध यंदा तोडण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांची मोठी अडचण दूर होणार आहे.

हंगाम सुरू करण्याबाबत दोन मतप्रवाह
पूरस्थितीमुळे हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, उतारा कमी मिळण्याच्या भीतीने कारखानदारांचा कल हंगाम लांबणीवर टाकण्याकडे आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीनंतरच ही संभ्रमावस्था मिटण्याची शक्यता आहे. समितीची बैठक यंदा सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याचा अंदाज असून नोव्हेंबरपासून गाळप सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 

इतर बातम्या
सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना...अकोला  : गेल्यावर्षात अत्यल्प पावसामुळे...
पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला ३१०० ते...पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
शेतीत सुधारित तंत्राने शाश्‍वत उत्पन्न...सोलापूर ः शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान...
येत्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला...कोल्हापूर ः सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
पुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया...पुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...