‘म्हैसाळ'चे आवर्तन बंद होण्याची शक्यता 

शेतकरी, पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार म्हैसाळ योजनेचे आवर्तन गेले तेरा दिवस सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी रीतसर पाणी मागणी केली नसल्यामुळे म्हैसाळ योजना बंद होण्याची शक्यता आहे.
‘म्हैसाळ'चे आवर्तन बंद होण्याची शक्यता Possibility of closing the cycle of ‘Mhaisal’
‘म्हैसाळ'चे आवर्तन बंद होण्याची शक्यता Possibility of closing the cycle of ‘Mhaisal’

सांगली : शेतकरी, पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार म्हैसाळ योजनेचे आवर्तन गेले तेरा दिवस सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांनी रीतसर पाणी मागणी केली नसल्यामुळे म्हैसाळ योजना बंद होण्याची शक्यता आहे. गेले तेरा दिवस उचललेल्या पाण्याच्या विद्युत बिलाची रक्कम कोणी भरायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मिरजपूर्व भागासह कवठेमहांकाळ, जतमधील दुष्काळी जनतेसाठी तातडीने म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी झेडपी, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला केली होती. दुष्काळी तालुक्‍यांतून टॅंकरची मागणी होईल. विहिरी, नाले, ओढे आटू लागल्याने जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍नाचा इशारा देण्यात आला होता. प्रत्येक वर्षी फेब्रुवारीतच योजना सुरू होणे अपेक्षित आहे.

यंदा मार्चमध्ये योजना सुरू झाली. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना मागणी नोंदविण्याचे आवाहन केले. किमान ५० हजार एकर मागणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात अगदीच कमी, अल्प मागणी आल्यामुळे पाटबंधारे विभागाने मुख्य कालव्यातच पाणी सोडले आहे. इतर तालुक्‍यांनी मागणी केली तरच पाणी सोडले जाणार आहे. गेल्या तेरा दिवसांपासून आवर्तन सुरू आहे. परंतु पाण्याची मागणी अद्यापही लाभ क्षेत्रातील तालुक्यांतून आलेली नाही. 

जलसंपदाच्या नियमानुसार ८१:19 प्रमाणात पाण्याचे पैसे भरावे लागतात. यातील १९ टक्के रक्कमही शेतकरी भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यातही मागणी नसल्याने योजनेचे आवर्तन सुरू ठेवायचे की बंद करायचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, योजनेचे आवर्तन सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. मागणी वाढली नाही तर योजनेच्या योजना बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पाणीपट्टीसह वीज बिलाचा प्रश्न कसा सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.    प्रतिक्रिया म्हैसाळ योजना गेले तेरा दिवस सुरू आहे. शेतकऱ्यांनी तातडीने अद्यापही मागणी नोंदवावी. अन्यथा नाईलाजास्तव योजना बंद करावी लागेल, अशी परिस्थिती येऊ देऊ नये.  -सूर्यकांत नलवडे, कार्यकारी अभियंता, म्हैसाळ सिंचन योजना. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com