agriculture news in marathi, The possibility of closure of Sangli's rotation | Agrowon

सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

सांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन येत्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.

सांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन येत्या आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांद्वारे दुष्काळी भागातील पाणीटंचाई दूर करण्यास मदत झाली. या योजना डिसेंबर महिन्यापासून सुरू आहेत. त्यांची प्रत्येकी तीन ते चार आवर्तने सुरू ठेवली. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने दुष्काळी पट्ट्यातील १६० तलाव पाण्याने भरून दिले. त्यामुळे पाणीटंचाई कमी झाली. त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंबाला टॅंकरने पाणीपुरवठा केला.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना तांत्रिक अडचणीमुळे पंधरा दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही योजना सुरू करण्यात आली. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना या विनाखंडित सुरू राहिल्या. त्यामुळे आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, खानापूर तालुक्यांतील शेती ओलिताखाली आली. शेतकऱ्यांनी पाणी आल्याने शेततळी भरून ठेवून शाश्वत पाण्याची सोय केली.

गेल्या पंधरा दिवसांपासून वारणा आणि कोयना धरणांत पाणी कमी झाले आहे. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. योजनांच्या पंपाची संख्या हळूहळू कमी करण्यात आली. परिणामी दुष्काळी भागात पाणी कमी दाबाने जात आहे. लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी देण्याचे नियोजन विस्कळित होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने पाण्याच्या उपलब्धतेनुसार योजनेतील पंपांची संख्या कमी करण्यास सुरवात केली आहे. पुढील आठवड्यापर्यंत या तिन्हीही योजना बंद करण्याचा हाचलाची पाटबंधारे विभागाने सुरू केल्या.

पाऊस पडेपर्यंत योजना सुरू ठेवा

वास्तविक पाहता जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली, तर मॉन्सून पूर्व पाऊस बरसला नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई आहे. त्यातच उपसा बंदी केली आहे. योजनेच्या मुख्य कालव्या लगत असणाऱ्या शेतीला पाणी देणे सोपे आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत योजना सुरू ठेवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

इतर बातम्या
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...
रस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव...नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापनेबाबत...नाशिक : जागतिक द्राक्ष उत्पादनात नाशिकचा मोठा...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सांगली जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू...सांगली ः शासनाच्या निर्णयानुसार १ ऑगस्टपासून चारा...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...