चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर पडण्याची शक्यता

येत्या हंगामातील कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांची निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे.
Possibility of cotton blight in Chandrapur district
Possibility of cotton blight in Chandrapur district

चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात दोनच खरेदी केंद्रांची निविदा प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी यंदाही कापूस उत्पादकांना कापूस विक्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

केंद्र सरकारने गेल्या हंगामात कापसाला ५५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला होता. त्या तुलनेत बाजारात मात्र यापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी झाली. त्यामुळे शासकीय केंद्रावर कापूस विक्रीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. याच कारणामुळे केंद्रावर गर्दी वाढत अनेक असुविधांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. भारतीय कापूस महामंडळाने येत्या हंगामाकरिता जिल्ह्यात केवळ भद्रावती आणि राजुरा ही दोन केंद्रच निश्चित केल्याने यावर्षी देखील तशाच प्रकारच्या गोंधळाची स्थिती कायम राहण्याची भीती वर्तविली जात आहे. खरेदी केंद्राकरिता सीसीआयने बुधवार (ता. १९) पर्यंत प्रस्ताव मागितले आहेत. जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, राजुरा, भद्रावती, चिमूर, चंद्रपूर, जिवती, गोंडपिंपरी, बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते.

दर्जात्मक कापूस उत्पादनात कोरपना आणि वरोरा तालुके आघाडीवर आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांत तरी सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे. सीसीआय कडून पुरेशी खरेदी केंद्र प्रस्तावित न झाल्यास बाजारात व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने कापसाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या खरिपात जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. परिणामी खरेदी केंद्राची संख्या न वाढल्यास यंदाही शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.

मनुष्यबळाअभावी केंद्रात कपात विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात खरेदी केंद्राचे नियोजन अकोला येथील कार्यालयातून होते. मात्र, सीसीआयकडे मनुष्यबळ कमी असल्याने येत्या हंगामासाठी अनेक ठिकाणी केंद्रात कपात करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com