agriculture news in Marathi possibility of decreased in cotton production by 24 lac bales Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्य

चंद्रकांत जाधव
बुधवार, 27 मे 2020

कापूस गाठींचे उत्पादन कापसावरील प्रक्रिया मंद असल्याने कमी येईल. परंतु शेतकऱ्यांकडे साठा असणार आहे. चीन, बांगलादेशातून जूनमध्ये कापसाची मागणी येवू शकते. कारण देशाच्या कापसाचे दर सर्वात कमी आहेत. यामुळे निर्यात वाढेल. तसेच दरातही सुधारणा अपेक्षित आहे. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) घट येणार आहे. याच वेळी गुजरातमध्ये ११ लाख तर महाराष्ट्रात आठ लाख गाठींनी घट होईल. देशात कापसाचा साठा विक्रमी स्थितीत म्हणजेच ५० लाख गाठींपर्यंत राहील, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.

देशात कापसाचे ३५४ लाख गाठींपर्यंतचे उत्पादन २०१९-२० च्या हंगामात येईल, असा अंदाज सुरवातीला असोसिएशनने व्यक्त केला होता. परंतु कोरोनामुळे कापसावर मंदावलेली प्रक्रिया व नैसर्गिक कारणांमुळे हे उत्पादन तब्बल २४ लाख गाठींनी कमी होईल, अशी स्थिती आहे. ऑक्‍टोबर २०१९ ते एप्रिल २०२० यादरम्यान देशात ३२९ लाख गाठींचा पुरवठा होईल, अशी शक्‍यता सुरवातीला व्यक्त करण्यात आली होती. परंतु एप्रिलअखेर २८५ लाख गाठींचा पुरवठा  झाला आहे. 

स्थानिक मागणीही कमी
कापसाची स्थानिक मागणीदेखील कमी झाली आहे. त्यात देशांतर्गत वस्त्रोद्योगात ३३१ लाख गाठींची गरज किंवा वापर होईल, असा अंदाजही होता. परंतु हा वापर २८० लाख गाठींपर्यंत मर्यादीत राहणार आहे. अर्थातच सुमारे ५१ लाख गाठींचा वापर देशांतर्गत वस्त्रोद्योगात कमी होणार आहे. कोरोनामुळे वस्त्रोद्योग ठप्प आहे. कापूस निर्यात बंद आहे. कापड उद्योगही अडचणीत आहे. यामुळे देशात कापसाची उचल किंवा वापरही कमी होणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. 

४७ लाख गाठींची निर्यात शक्‍य
देशातून ४७  लाख गाठींची निर्यात शक्‍य आहे. सुरवातीला असोसिएशनने ४२ लाख गाठींच्या निर्याचीची शक्‍यता व्यक्त केली होती. परंतु निर्यातीसाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे. आशियातील काही देश कापसासाठी भारताकडे येतील, अशी शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे. 

आयातीलाही फटका
देशातील वस्त्रोद्योग ठप्प आहे. देशात उत्पादीत न होणाऱ्या पिमा, गिझा प्रकारच्या कापसाची आयात ऑस्ट्रेलिया, इजिप्त, तुर्की आदी देशांमधून केली जाते. तसेच अमेरिकेकडूनही काही ब्रॅण्डेड वस्त्रोद्योग कापसाची आयात करतात. देशात २५ गाठींची आयात होईल, असा अंदाज सुरवातीला होता. परंतु ही आयात १५ लाख गाठींपर्यंत मर्यादीत राहण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामाच्या तुलनेत आयात १७ लाख गाठींनी कमी होणार आहे.

देशातील कापूस उत्पादन (लाख गाठी) 

२०१८-१९ ३१२ 
२०१९-२० ३३० (अंदाज)

या राज्यांमध्ये असे घटणार उत्पादन (लाख गाठींमध्ये)

पंजाब ०.५०
हरयाना १.००
राजस्थान ०.५०
गुजरात ११.००
महाराष्ट्र ८.५०
आंध्र प्रदेश १.००
कर्नाटक २.००
एकूण घट २४.५०

इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...