रत्नागिरी जिल्ह्यात भविष्यात पाणीटंचाईची शक्यता 

रत्नागिरी ः मे महिन्यात वाढत असलेल्या उष्म्याने जिल्ह्यात वाडी-वस्तीवर टंचाईची झळ बसू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांतील पाणी साठाही दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. तीन मध्यम प्रकल्पासह ४६ लघू पाटबंधारे प्रकल्पात १००.४२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण साठ्याच्या ४९.९६ टक्के साठा असून गतवर्षीच्या तुलनेत चार टक्केने घट झाली आहे.
Possibility of future scarcity in Ratnagiri district
Possibility of future scarcity in Ratnagiri district

रत्नागिरी ः मे महिन्यात वाढत असलेल्या उष्म्याने जिल्ह्यात वाडी-वस्तीवर टंचाईची झळ बसू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांतील पाणी साठाही दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. तीन मध्यम प्रकल्पासह ४६ लघू पाटबंधारे प्रकल्पात १००.४२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण साठ्याच्या ४९.९६ टक्के साठा असून गतवर्षीच्या तुलनेत चार टक्केने घट झाली आहे. 

या प्रकल्पांवर धरण क्षेत्रांसह सुमारे शेकडो ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा होतो. अजून तीन आठवडे कालावधी शिल्लक असल्याने भविष्यात टंचाईच तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी नातूवाडी २७.२३० पैकी १३.३१० दलघमी साठा असून ४८.८८ टक्के पाणी आहे. अर्जूना प्रकल्पात ७२.५६० पैकी ६८.९८४ दलघमी तर गडनदी प्रकल्पात ८२.९०० पैकी ४०.२३१ दलघमी साठा आजच्या घडीला उपलब्ध आहे. गतवर्षी तुलनेत कमी साठा उपलब्ध होता. यंदा मध्यम प्रकल्पातील साठा पुरेसा आहे. 

गतवर्षी जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पात १०५.६७ दलघमीटर एवढा साठा होता. यंदा तो १००.४२ इतका आहे. मागील आठवड्यात १०३.६३ दलघमीटर साठा होता. आठ दिवसांत तीन दलघमीटर पाण्याचा वापर झाला आहे. २०१८ मध्ये याच कालावधीत ४१.४२ टक्के साठा होता. तीव्र उन्हामुळे सध्या जिल्ह्यातील पाणीस्त्रोत झपाट्याने खाली येत आहेत. 

एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातीलच नव्हे तर नदी, नाल्यांमधील पाणीसाठ्यांचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागले आहे. जमिनीत वेगाने पाणी मुरत असल्यामुळे नद्या, नाले कोरडे पडत आहेत. गतवर्षी यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती. यंदा पाऊस लांबल्यामुळे बहुतांशी पाटबंधारे प्रकल्पात पुरेसा साठा उपलब्ध होता. मार्चनंतर हा साठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. 

लघू पाटबंधारे प्रकल्पाचा उपयोग नळपाणी योजनांसाठी केला जातो. जिल्ह्यात सुमारे शंभरहून अधिक ग्रामपंचायतींना या धरणांवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणलोटामुळे किनारी भागातील विहिरींची पाणीपातळीही स्थिर राहते. जसेजसे धरणातील पाणी कमी होते, तसे विहिरींची पातळी घटते. मे महिन्यात दरवर्षी पाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ लागतो. 

या धरणांवर मोठ्या प्रमाणात सिंचन योजना नसल्यामुळे पाण्याचा अधिकाधिक वापर हा पिण्यासाठीच होतो. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा कमी होत आहे. सर्वाधिक पाऊस पडूनही जिल्ह्यातील दुर्गम भागात टंचाई जाणवत आहे. तिथे पाणी पुरवणे शक्य नसल्यामुळे ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com